काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘पारू’ मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या मालिकेने अत्यंत कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अवखळ, मनसोक्त जगणारी ‘पारू’ प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच ‘पारू’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने खास सुंदर पोस्ट लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘पारू’ मालिकेतून एक्झिट झालेला अभिनेता सचिन देशपांडेने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पोस्ट लिहिली आहे. ‘पारू’ मालिकेत त्याने अजयची भूमिका साकारली होती. आज सचिनने लग्नातील खास क्षणाचे फोटो शेअर करत बायकोसाठी लिहिलं आहे, “सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण. म्हणजे नवीन टर्मचं पण एक वर्ष पूर्ण केलंय आपण, ते ही यशस्वी पणे, अशा अनेक टर्म माझं मत कायम तुम्हालाच पडणार आहे याची खात्री बाळगा. पण गेल्या ६ वर्षातलं हे वर्ष सगळ्यात कठीण होतं. एका कलाकाराशी लग्न करताना हा काळ आपल्या आयुष्यात येईल, याची तुला कल्पना जरी असली तरी तो काळ प्रत्यक्षात आल्यावर काय करायला हवं याची पूर्व तयारी करता येत नाही, पण तरीही तू मला या काळात जे काही सांभाळून घेतलंस त्याला तोड नाही.”

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Anniversary
शोमध्ये पहिली भेट ते श्री व सौ! मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच खास पोस्ट; ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष
devoleena bhattacharjee blessed with baby boy
Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन
Marathi actress Shivani sonar will wear panaji nath in wedding
Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
actor Shalva Kinjawadekar first Wedding Photo out
‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर अडकला लग्नबंधनात, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला लग्नातील पहिला फोटो
Gharoghari Matichya Chuli Fame sumeet pusavale share special post for wife of wedding anniversary
‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला, “माझ्यावर कितीही रुसलीस…”
Vinod Kambli wife Andrea Hewitt
Vinod Kambli Wife: ‘पोस्टरवर पाहिलं आणि ठरवलं हिच्याशीच लग्न करणार’, पत्नी अँड्रियाशी दुसरे लग्न; विनोद कांबळींनी सांगितली लव्ह स्टोरी

हेही वाचा – Video: मराठमोळ्या मृणाल ठाकूरला आईने डब्यात दिल्या लाह्या अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अभिनेत्याने पुढे लिहिलं आहे, “तुझं निव्वळ असणंच मला इतका आत्मविश्वास देऊन जातं ना, तू आहेस म्हणून मी तरलोय, अशीच कायम माझ्या बरोबर राहा आणि अशा अनेक पंचवार्षिक योजना आपण एकत्र पूर्ण करत राहू…बाकी हे तुझ्यासाठी खास…
अमुक माझं तमुक तुझं
जुनं माझं ताज तुझं
भूत माझा भविष्य तुझं
साधना माझी यश तुझं
आता जे काही आहे माझं
ते सारं सारं तुझं
माझ्या परमेश्वरातला “प” ही तुझा
आणि माझ्या श्रद्धेतलं स्थान ही तुझंच”

सचिन प्रमाणे त्याची बायको पियुषा देशपांडेने देखील खास पोस्ट लिहिली आहे. सचिनबरोबर फोटो शेअर करत लिहिलं आहे, “याच दिवशी गेल्या वर्षी…संकल्प केला होता पटकन चिडण कमी करण्याचा…तसा योग आला नाही की तू चान्स दिला नाहीस मला रागवण्याचा? आता, मी झाले समजूतदार की तू झालास शहाणा…याचा हिशेब काही मांडत नाही…कारण काहीही असलं तरी एवढं मात्र नक्की की आपलं एकमेकांशिवाय काहीही होऊ शकत नाही…लग्नाच्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा….नवऱ्या…बाकी दिनचर्ये प्रमाणे तुझं माझं मीराच ब्रीदवाक्य….”घट्ट मिठी, भरपूर सारं प्रेम, आय भयंकर लव्ह यू… आणि खास मोबाइल गिफ्टसाठी खूप धन्यवाद… आता मी तुमच्या वनप्लस कम्युनिटीमध्ये सामिल झाले.”

दोघांच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री नंदिता पाटकर, सुमेधा दातार, अद्वैत दादरकर, अभिजीत खांडकेकर, मुग्धा कर्णिक, शरयू सोनावणे, अशा अनेक कलाकारांनी सचिन व पियुषा यांना लग्नाच्या सहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader