Purva Shinde And Prasad Jawade Dance Video: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेचा दिवसेंदिवस प्रेक्षक वर्ग वाढताना दिसत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना खूप चांगलं खिळवून ठेवलं आहे. अभिनेत्री शरयू सोनावणेने साकारलेली पारू, प्रसाद जवादेने साकारलेला आदित्य, मुग्धा कर्णिकने साकारलेली अहिल्यादेवी, पूर्वा शिंदेने साकारलेली दिशा अशा प्रत्येक कलाकाराने साकारलेली आपापली पात्र उत्तमरित्या निभावली आहेत. त्यामुळे आता ही सर्व पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर ‘पारू’ मालिकेतील कलाकारांनी रील व्हिडीओमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच दिशा म्हणजे अभिनेत्री पूर्वा शिंदेने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पूर्वाबरोबर प्रसाद जवादे डान्स करताना दिसत आहे.
“Our pookie प्रसाद जवादे”, असं कॅप्शन लिहित पूर्वा शिंदेने नुकताच डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूर्वा व प्रसाद जवादे लोकप्रिय पंजाबी गाण्यावर थिरकले आहेत. दोघं काळी अॅक्टिव्हा गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर पूर्वाने लिहिलं आहे, “जेव्हा जबरदस्तीने केलेला रील व्हिडीओ चांगला होतो.”
पूर्वा शिंदे व प्रसाद जवादेच्या या व्हिडीओवर इतर कलाकारमंडळींसह अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. “गोड”, “माझे दोन आवडते कलाकार एकाच फ्रेममध्ये”, “माझी सर्वात आवडती पूर्वा शिंदे”, “तुम्ही दोघं फार गोड आहात”, “भारी”, “क्या बात है”, “मस्त…जबरदस्त”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत. आतापर्यंत दोघांचा हा डान्स व्हिडीओ ३० हजारांहून अधिक लोकांनी पाहायला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘पारू’ मालिकेतून अभिनेत्री श्वेता खरातच्या अनुष्का या पात्राचा शेवट झाला. अनुष्का आदित्यला किडनॅप करते आणि अहिल्याकडे पैशांची मागणी करताना दाखवलं होतं. पण, यावेळी पारू शक्कल लढवून पैशांच्या सुटकेसमध्ये बसते. त्यामुळे ती आदित्य व अहिल्यादेवीपर्यंत पोहोचते. तेव्हा पारू अनुष्काला दिशाविरुद्ध भडकवून तिला बोलण्यात गुंतवते. याचीच संधी साधून आदित्य व अहिल्यादेवी एकमेकांची सुटका करतात. त्यानंतर शेवटी अनुष्काचा खरा चेहरा समोर येतो आणि तिचा आगीत मृत्यू होतो. अशाप्रकारे जबरदस्त ट्रॅकनंतर अनुष्काच्या भूमिकेचा प्रवास संपतो.