‘पारू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेला कमी वेळात चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. पारूची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय.
शरयू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनयाव्यतिरिक्त सेटवरील मजा, मस्ती, डान्स व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. शरयूने नुकताच ‘ए कांचन’ या गाण्यावर पूर्वाबरोबर डान्स केला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
आता पारूने गणीबरोबर एका ट्रेंडिग गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. भाडिपाचं “अतिशय युनिक अतिशय वेगळा असा आळस…” हे गाण काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे. अनेक कलाकार आणि इन्फ्लुएंसर्स या रॅप गाण्यावर रील्स बनवत आहेत. ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणे आणि गणीची भूमिका साकारणारा देवदत्त घोणे यांनीदेखील या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत पारू पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीवर दिसतेय. तिने यात मुंडावळ्या देखील घातल्या आहेत. तर देवदत्त त्याच्या गणीच्या भूमिकेतील कपड्यांमध्ये आहे.
सध्या ‘पारू’ या मालिकेत ब्रॅंडच्या शूटसाठी पारू आणि आदित्यचं लग्न होतंय असा सीक्वेन्स सुरू आहे. पारूने या वधूच्या वेशातच हा व्हिडीओ केलेला दिसतोय. काही वेळातच सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. “सेटवर दुपारच्या लंच ब्रेक नंतर जेव्हा लगेच सीन लागतो तेव्हा” असं कॅप्शन शरयूने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा… VIDEO: लंडनमध्ये पतीबरोबर फिरताना व्हिडीओ काढणाऱ्यावर भडकली कतरिना कैफ, नेटकरी म्हणाले…
शरयूच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, तू खूप सुंदर दिसतेयस. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “नवीन नवरी एकदमच भारी दिसतेय.” अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, विजय पटवर्धन, शंतनू गंगणे, अतुल कासवा, देवदत्त घोणे, अनुज साळुंखे, श्रुतकीर्ती सावंत यांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.