‘झी मराठी’ वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘पारू’ मालिका. १२ फेब्रुवारी २०२४ला सुरू झालेल्या या मालिकेला सहा महिने नुकतेच पूर्ण झाले आहेत. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच मालिकेतील तगड्या कलाकार मंडळींनी आपापल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली असून आता घराघरात प्रत्येक भूमिका पोहोचली आहे. यापैकी एक म्हणजे पारू. अभिनेत्री शरयू सोनावणेने ( Sharayu Sonawane ) पारू भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. त्यामुळे आज शरयूला पारू भूमिकेद्वारेच ओळखलं जात आहे. नुकताच शरयूने ग्लॅमरस लूकमधील व्हिडीओ शेअर केला होता; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री शरयू सोनावणेने ( Sharayu Sonawane ) काळ्या रंगाच्या स्कर्ट-टॉपमधील ग्लॅमरस लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शरयूचा स्कर्ट-टॉप लूकमध्ये क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. अक्षय कुमारच्या ‘सखियां २.०’ गाण्यावर शरयू वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. शरयूच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती करोडपती निखिल कामथला करतेय डेट, बाईकवरचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले…

पारूचा लूक पाहून नेटकरी काय म्हणाले?

व्हिडीओमधील शरयूच्या ( Sharayu Sonawane ) लूकचं कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “पारू तू खूपच सुंदर दिसत आहेस”, “छान”, “गॉर्जस लेडी”, “शरयू खूप सुंदर”, “क्यूट”, “बार्बी डॉल”, “खूप गोड दिसतेस शरयू”, “व्वा पारू” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी शरयूच्या व्हिडीओ दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “अत्याचाराच्या रक्ताचा टीळा माथ्यावर लावून…”, कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणावर प्रथमेश परबच्या पत्नीने कविवेतून मांडलं परखड मत

दरम्यान, याआधी शरयू सोनावणेचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये शरयू कोल्हापुरी हलगीवर डान्स करताना दिसली आहे. शरयू ( Sharayu Sonawane ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, मालिकांसह तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. ‘सूर सपाटा’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती शरयूचा नवरा जयंत लाडेने सांभाळली होती. शरयूचं जयंत लाडेबरोबर ३ एप्रिल २०२३रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. पुण्यातील केरबाची वाडी येथील शरयू व जयंत लग्नसोहळा पार पडला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame sharayu sonawane another video viral pps