‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता खरातची मालिकेत एन्ट्री झाली. तिने अनुष्काची भूमिका साकारली आहे. मालिकेत अनुष्का पारूला मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे आता पारू अनुष्काचं ऐकून किर्लोस्कर घराला आणि आदित्यला सोडून जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकाबाजूला हे सर्व नाट्य घडतं असताना दुसऱ्याबाजूला पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणे आपल्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकतं आहे.

अभिनेत्री शरयू सोनावणेने नुकताच एक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शरयू प्रिया किर्लोस्कर म्हणजेच संजना काळेबरोबर डान्स करताना दिसत आहे. दोघी देखील जबरदस्त डान्स करत आहेत.

yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
Prajakta Mali
“…तर माझं वजन ७० किलो असतं”, ५१ किलो…
Punha Kartvya Aahe
Video : वसुंधराच्या हक्कासाठी आकाश उचलणार मोठे पाऊल; आईची अट मान्य करत म्हणाला, “तुमचा हक्काचा मान…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Wedding
शुभमंगल सावधान! ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; फोटो शेअर करत म्हणाली…
ashok saraf reaction on television comeback
“मी मालिका करणार नव्हतो, पण…”, अशोक सराफ यांनी सांगितलं टेलिव्हिजनवर कमबॅक करण्याचं कारण; म्हणाले, “निवेदिता…”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Bigg Boss Marathi Fame Chota Pudhari Aka Ghanshyam Darode upset with nikki and arbaz
निक्की-अरबाजने ‘ते’ वचन पाळलंच नाही! छोटा पुढारी घन:श्यामची जाहीर नाराजी; नेटकरी म्हणाले, “दोघांनी फक्त तुझा वापर…”
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो

हेही वाचा – Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव आलं समोर, टॉप-२मध्ये असण्याची ‘बिग बॉस’ने केली होती भविष्यवाणी

शरयू आणि संजना यांनी श्रद्धा कपूर आणि वरुण धवनच्या Illegal Weapon 2.0 या गाण्यावर डान्स केला आहे. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. ते म्हणजे दोघींचा Illegal Weapon 2.0 या गाण्यावर लावणीचा ठसका पाहायला मिळत आहे. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

अभिनेत्री शरयू सोनावणे आणि संजना काळे यांच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघींच्या डान्सचं कौतुक करत आहेत. “वाव”, “कमाल”, “बवाल”, “शरयू क्या बात है”, “अगं बाई आमची पारू तर खूप छान डान्स करते”, “परफेक्ट”, “कमाल”, “जलवा”, “जबरदस्त”, “मस्त”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अंकिता वालावलकरला म्हणाला ‘हडळ’, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

प्रतिक्रिया
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा – अभिनेत्री ऋतुजा बागवेला मिळाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पोस्ट करत ट्रोलर्सचे मानले आभार; म्हणाली…

दरम्यान, शरयू सोनावणेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘पारू’ मालिकेच्या आधी ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘पिंकीचा विजय असो’मध्ये झळकली होती. मालिकांसह तिने काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. ‘सूर सपाटा’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाची निर्मिती शरयूचा नवरा जयंत लाडेने सांभाळली होती. शरयूचं जयंत लाडेबरोबर ३ एप्रिल २०२३रोजी मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं. पुण्यातील केरबाची वाडी येथील शरयू व जयंत लग्नसोहळा पार पडला होता. तसंच संजना काळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने सुद्धा मालिकांसह काही चित्रपटात काम केलं आहे.

Story img Loader