झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं. तसंच पारूची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. शरयू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी शरयू मालिकेच्या सेटवरील धमाल मस्ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते.

या मालिकेत दिशा हे खलनायिकेचं पात्र साकारणारी पूर्वा शिंदेबरोबर शरयू अनेकदा डान्स रील्स बनवत असते. अलीकडेच “ए कंचन” या ट्रेंडिग गाण्यावर दोघी थिरकल्या होत्या. तर दोघींनी प्रसादबरोबर ‘पुष्पा-२’च्या “अंगारो सा” या गाण्यावरदेखील हूकस्टेप करत डान्स केला होता. तो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशातच दोघी पुन्हा एकदा एका पहाडी गाण्यावर थिरकल्या आहेत. या डान्सचा व्हिडीओ शरयू आणि पूर्वाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. सोशल मीडिया इंफ्लूएन्सर्स ते कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

हेही वाचा… “काकाच जास्त एन्जॉय…”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी तेलुगू गाण्यावर केला हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल होताच चाहते म्हणाले…

“मै तेरी रानी तू मेरो हुकूम को एक्का…” या पहाडी गाण्यावर आता शरयू आणि पूर्वा या जोडीने हटके स्टेप्स करत रील बनवली आहे. या गाण्यात शरयू कलरफुल ड्रेसवर दिसतेय तर पूर्वाने काळ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केलाय. दोघींच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. शरयू आणि पूर्वाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेत्रींच्या चाहत्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा… २६ वर्षांपूर्वीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर थिरकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब; डान्सर रुपेश बनेने दिली साथ, व्हिडीओ व्हायरल

एका चाहत्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, “तुमचा हा ऑफ स्क्रिन बॉन्ड आम्हाला खूप आवडतोय.” तर एका चाहत्याने विनंती करत लिहिलं, “कृपया प्रसादबरोबर आणखी एक रील करा तुम्हा तिघांचा डान्स व्हिडीओ खूप छान झाला होता.”

हेही वाचा… ठरलं तर मग: पूर्णाआजीला सायलीमध्ये दिसणार प्रतिमाचं रूप! मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो

दरम्यान, पारू मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, विजय पटवर्धन, शंतनू गंगणे, अतुल कासवा, देवदत्त घोणे, अनुज साळुंखे, श्रुतकीर्ती सावंत यांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.

Story img Loader