झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेने कमी वेळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं. या मालिकेतील पारू आणि आदित्यच्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातलीय, तर खलनायिकेची भूमिका साकारणारी दिशादेखील कायम चर्चेत असते. या पारू आणि दिशाची ऑनस्क्रीन बॉन्डिग जरी खलनायिका-नायिकेची असली तरी ऑफस्क्रीन दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशाची भूमिका साकारणारी पूर्वा शिंदे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मालिकेची सुरुवात झाल्यापासून पूर्वाने कधी सेटवरील तिचे फोटो, तर कधी डान्सचे व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. आता पूर्वाने यात शरयूलादेखील सामील केलंय. पारूची भूमिका साकारणारी शरयू सोनावणेदेखील इन्स्टाग्रामवर वेगवेगळे रिल्स शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.

हेही वाचा… हातात हात अन्…, जान्हवी कपूरने शेअर केला शिखर पहारियाबरोबरचा रोमॅंटिक फोटो, अभिनेत्री म्हणाली…

काही दिवसांपूर्वी शरयू आणि पूर्वाचा ‘ए कंचन’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या जोडीने प्रसादला सामील करत ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या ट्रेंडिग गाण्यावर रील शेअर केली आहे. पुष्पा चित्रपटातील ‘अंगारो’ हे गाण नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्याच्या हूकस्टेपने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. गाण रीलिज झाल्यानंतर अनेक कलाकारांनी ही हूकस्टेप करत सोशल मीडियावर रिल्स शेअर करायला सुरुवात केलीय.

पूर्वा, शरयू आणि आदित्यनेदेखील हटके अंदाजात डान्स करत ही रील सोशल मीडियावर शेअर केलीय. “पुष्पा इन पारू स्टाईल” असं कॅप्शन शरयूने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने दिलं रिंकू राजगुरूला वाढदिवसानिमित्त ‘हे’ खास सरप्राईज, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली…

तिगडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. अगदी काही वेळातच या व्हिडीओला तीन हजारांपेक्षा जास्त व्यूज मिळाले आहेत. चाहत्यांनी तर या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “वाह क्या बात है”, तर दुसऱ्याने “विषयच हार्ड” अशी कमेंट केली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा सामी एकदम भारीच आहे.”

दरम्यान, ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, विजय पटवर्धन, शंतनू गंगणे, अतुल कासवा, देवदत्त घोणे, अनुज साळुंखे, श्रुतकीर्ती सावंत यांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame sharayu sonawane purva shinde prasad jawade dance on angaaron sa saami from pushpa 2 dvr