झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका कमी वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पारूची भूमिका साकारणारी शरयू सोनावणेने प्रेक्षकांना भुरळ घातलीय. शरयू सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी शरयू मालिकेच्या सेटवरील धमाल मस्ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरयू या मालिकेतील सहकलाकारांबरोबर डान्स व्हिडीओ शेअर करत असते. अनेकदा ती पूर्वा आणि आदित्यबरोबर थिरकताना दिसते. अलीकडेच “ए कंचन” या ट्रेंडिग गाण्यावर शरयू आणि पूर्वा थिरकल्या होत्या. तर शरयूने प्रसादबरोबर ‘पुष्पा-२’च्या “अंगारो सा” या गाण्यावरदेखील हूकस्टेप करत डान्स केला होता. आता ‘पारू’ या मालिकेत नव्याने एन्ट्री झालेल्या अभिनेत्रीबरोबर शरयू थिरकली आहे.

हेही वाचा… “Biggest Crush…”, रणवीर सिंहने शेअर केले दीपिका पदुकोणच्या बेबी बंपचे फोटो, म्हणाला…

‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत आरतीची भूमिका साकारणारी संजना काळेची आता पारू या मालिकेत एन्ट्री झाली आहे. मालिकेत आल्याबरोबर संजना सहकलाकारांबरोबर चांगलीच रुळलेली दिसतेय. संजनाने आता शरयूबरोबर एक हटके डान्स केला आहे. शरयू आणि संजनाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘नटरंग’ चित्रपटातील “नटरंग उभा” या गाण्यावर दोघी थिरकल्या आहेत. यात शरयूने पारू या भूमिकेतील कपड्यांवर दिसत आहे. परकर पोलक्यामध्ये पारू दिसतेय. तर संजना आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. दोघींनीही अगदी हटके डान्स स्टेप करत एनर्जेटीक डान्स केला आहे.

पारू मालिकेतील अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्ही दोघीही सुंदर आणि छान कलाकार आहात.” दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, दोघींनीही खूप मस्त डान्स केला आहे. तर अनेकांनी हार्टचे, टाळ्यांचे इमोजी शेअर करत या अभिनेत्रींचं कौतुक केलं आहे. काही वेळातच या व्हिडीओला ४८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत..

हेही वाचा.. “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

दरम्यान, झी मराठीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. ‘पारू’ मालिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर मुग्धा कर्णिक, पूर्वा शिंदे, विजय पटवर्धन, शंतनू गंगणे, अतुल कासवा, देवदत्त घोणे, अनुज साळुंखे, श्रुतकीर्ती सावंत, यांच्या निर्णायक भूमिका या मालिकेत आहेत.