Sharayu Sonawane shares photo with Co Actor: अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या ‘पारू'( Paaru) मालिकेमुळे मोठ्या चर्चेत असल्याचे दिसतेय. मालिकेत आलेले ट्विस्ट असो व खऱ्या आयुष्यातली मजा-मस्ती अशा विविध कारणांमुळे शरयू सोनावणे मोठ्या चर्चेत असल्याचे दिसते. मालिकेबरोबरच शरयू सोशल मीडियावरील पोस्टमधूनदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

शरयू सोनावणे काय म्हणाली?

आता शरयूने सोशल मीडियावर अभिनेते अतुल कासवा यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. पारू या मालिकेत अभिनेत्रीने पारू ही भूमिका साकारली आहे; तर अतुल कासवा यांनी तिच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. आता शरयूने सोशल मीडियावर ऑनस्क्रीन वडिलांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. विशेष बाब म्हणजे या दोन कलाकारांनी याआधीही एकत्र काम केले आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. त्या मालिकेत शरयूच्या पात्राचे नाव हे पिंकी होते; तर अतुल यांच्या पात्राचे नाव हे महादू होते. त्याचा उल्लेख करीत शरयूने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेली कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री शरयू सोनावणेने सोशल मीडियावर ऑनस्क्रीन वडिलांबरोबर म्हणजे मारुतीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या मालिकेतील गेटअपमध्ये आहे; तर दुसरा फोटो हा पिंकीचा विजय असो या मालिकेतील गेटअपमधला आहे. पहिल्या फोटोत शरयूने गॉगल लावला आहे; तर दुसऱ्या फोटोत अतुल कासवा यांनी गॉगल घातल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करताना शरयूने लिहिले, “आयुष्यात विविध पात्रे साकारायला मिळतात. फक्त त्याचा आनंद घेता आला पाहिजे. तुम्हाला आवडतेय का ही ‘PM’ ची जोडी? PM म्हणजे पिंकी ते पारू आणि महादू ते मारुती”, अशी कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिली आहे.

शरयूच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कौतुक करीत कमेंट्स केल्या आहेत. त्यांची ही जोडी आवडत असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. “लय भारी राव”, “पिंकीची भूमिका छान होती”, “ही जोडी खूप जास्त आवडते”, “खूप गोड”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्याबरोबरच अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

पारू मालिकेतील शरयू सोनावणे व अतुल कासवा यांच्या भूमिकांबद्दल बोलायचे, तर त्यांनी मालिकेत बाप-लेकीची भूमिका साकारली आहे. किर्लोस्करांच्या घरात वर्षानुवर्षे मारुती ड्रायव्हरची नोकरी करतो. या कुटुंबाविषयी त्याला आस्था आहे. तो निष्ठेने तेथील काम करतो. पारू ही त्याची मुलगी. गावात वाढलेली पारू वडील मारुती आणि अहिल्यादेवी किर्लोस्करांची सेवा करण्यासाठी शहरात येते. वडिलांप्रमाणेच ती किर्लोस्कर कुटुंबाचीही मनापासून सेवा करते. वेळोवेळी त्यांच्या मदतीला धावून जाते. किर्लोस्कर कुटुंबदेखील तिला उत्तम वागणूक देतात. तिला त्यांच्यातील घरातील सदस्य मानतात. मारुती मात्र पारूला आपली पायरी बघून वागावं, अशी वेळोवेळी ताकीद देताना दिसतो. बाप-लेकीमध्ये मोठे प्रेम असल्याचे दिसते. दोघांतील बॉण्डिंग प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे.