सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे महत्त्वाचे माध्यम झाले आहे. सामान्य व्यक्तींपासून ते जगातील सर्वांत प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तींपर्यंत सर्वच जण या सोशल मीडियाचा वापर करतात. खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या जातात. मनोरंजनाचे साधन म्हणूनही सोशल मीडियाकडे पाहिले जाऊ लागले आहे. विनोदी रील्स, महत्त्वाची माहिती अशा विविध स्वरूपांत सोशल मीडियाकडून सामान्य व्यक्तींना माहिती दिली जात असते. याच माध्यमातून कलाकारांच्या आयुष्याबद्दलही जाणून घेता येते. ते शेअर करीत असलेले फोटो, रील, व्हिडीओ, एखादी भावूक करणारी पोस्ट अशा अनेकविध गोष्टी चाहत्यांना पाहता येतात. अनेकदा चाहते त्यावर कमेंट्सही करताना दिसतात. आता ‘पारू'(Paaru)फेम अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
अभिनेत्री शरयू सोनावणेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही अभिनेत्री श्वेता खरातबरोबर मजा करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोघेही ट्रॅम्पोलिनवर उड्या मारत आनंद घेत आहेत. त्याचबरोबर त्यांनी फोटोदेखील काढले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना शरयूने हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर, शरयूने शेअर केलेल्या या व्हिडीओवर श्वेता खरातने कमेंट केल्याचे दिसत आहे. श्वेताने कमेंट करीत लिहिले, “काय दिवस होता. खूप आठवणी तयार करताना”, असे लिहीत तिने शरयूला टॅग केले आहे.
अभिनेत्री श्वेता खरात व शरयू सोनावणे या दोघी पारू या मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेत शरयूने पारूची भूमिका साकारली असून, श्वेताने अनुष्का ही भूमिका साकारली आहे. पारू ही कमी शिकलेली, गावाकडची मुलगी असून, ती शहरात तिच्या वडिलांची व अहिल्यादेवीची सेवा करण्यासाठी आली आहे. अहिल्यादेवीला ती देवी मानत, ती किर्लोस्करांच्याच घरात काम करते. तिचे घरातही सर्वांबरोबर उत्तम नाते आहे. अहिल्यादेवीचा मुलगा आदित्य व पारू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण, पारू आदित्यच्या प्रेमात पडली आहे. मात्र, आता आदित्यचे लग्न अनुष्काबरोबर ठरले आहे. अनुष्का ही आदित्यसाठी उत्तम असल्याचे सर्वांनी म्हटले होते.
हेही वाचा: ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितली ‘या’ रोमँटिक चित्रपटाची आठवण; म्हणाले…
काही दिवसांपूर्वी अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली आहे. ती तिच्या बहिणीच्या दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ‘किर्लोस्कर हाऊस’मध्ये आली आहे आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी तिने सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, अनुष्का बदला घेण्यासाठी नेमके काय करणार आणि पारू आदित्यवर असलेले प्रेम लपवू शकणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.