‘पारू'(Paaru) व ‘लक्ष्मी निवास’ या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. सध्या या मालिका एकत्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही मालिकांमध्ये मंगलकार्य असल्याचे पाहायला मिळत आहे. पारू मालिकेतील अनुष्का व आदित्यचा साखरपुडा आहे, तर लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवी व जयंतचे लग्न आहे. या मालिकांचा महासंगम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहे. आता पारू मालिकेत काम करणारी अभिनेत्री श्वेता खरातने हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. याबरोबरच हर्षदा खानविलकर व तुषार दळवी यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केल्याचेदेखील म्हटले आहे.

मी आतापर्यंत हर्षदाताईबद्दल ऐकलं होतं की…

अभिनेत्री श्वेता खरातने नुकताच अल्ट्रा मराठी बझबरोबर संवाद साधला. यावेळी हर्षदा खानविलकर व तुषार दळवी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? अशा आशयाचा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना श्वेता खरातने म्हटले की, ते दोघेही खूप सकारात्मक आहेत. कारण-मी आतापर्यंत हर्षदाताईबद्दल ऐकलं होतं की ती प्रेमळ व्यक्तींपैकी एक आहे आणि खरंच ती खूप प्रेमळ आहे, खूप काळजी घेते. प्रत्येक माणसाबद्दल तिला प्रेम आहे. ती प्रत्येकाशी प्रेमाने वागते, काळजी घेते. आमचं जर आऊटडोअर शूट असेल तर कोणी उन्हात असेल तर ती त्यांना छत्री द्यायला सांगते. तिचं सगळीकडे लक्ष असतं. ती इतकी शांतपणे बोलते की असं वाटतंच नाही की पहिल्यांदा भेट होतेय. तसंच तुषार सरांबरोबर आहे. त्यांच्याबरोबर छान गप्पा सुरू असतात.”

श्वेता खरातने पारू मालिकेत अनुष्काची भूमिका साकारली आहे. आता अनुष्का व आदित्यचा साखरपुडा पार पडणार आहे. अहिल्यादेवीने तिला आदित्यसाठी निवडले आहे. मात्र, अनुष्काने हे सर्व घडवून आणले आहे. याबरोबरच पारूसुद्धा आदित्यला तिचा नवरा मानते, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दरम्यान, लक्ष्मी निवास ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

Story img Loader