‘पारू'(Paaru) ही मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत सतत काहीतरी नवीन गोष्टी घडताना दिसतात. आता काही दिवसांपूर्वीच किर्लोस्कर कुटुंबाच्या आयुष्यात अनुष्का आली आहे. स्वत:च्या पायांवर उभी असणारी, आत्मविश्वासू असलेली अनुष्का किर्लोस्कर कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेते. अहिल्यादेवी किर्लोस्करने तिचा लाडका मुलगा आदित्यसाठी तिला पसंत केले आहे. अनुष्कानेदेखील आदित्यला त्याच्या वाढदिवसाला प्रपोज केले. मात्र, अनुष्काचा किर्लोस्करांच्या कुटुंबात येण्याचा उद्देश वेगळाच आहे. आता समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये पारूला आदित्यच्या बोलण्याचे वाईट वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाला आदित्य?

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर ‘पारू’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अनुष्का व आदित्यमध्ये संवाद सुरू आहे. अनुष्का आदित्यला म्हणते, “तू, पारूबद्दल एवढा इमोशनल का आहेस? नेमकं काय नातं आहे तुमच्यामध्ये? प्लीज सांग मला.” तेवढ्यात पारू येते. आदित्यचे तिच्याकडे लक्ष जात नाही. तो अनुष्काच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतो, “तू एक शिकलेली, वेल सेटल बिझनेस वूमेन आहेस. पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली आणि या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली सामान्य मुलगी आहे. तुझी आणि तिची तुलना कधीही होऊ शकत नाही.” आदित्यने पारूबद्दल उच्चारलेले हे शब्द पारू ऐकते आणि तिला वाईट वाटत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
isha kopikar not selected for don 2 movie
शाहरुख खानच्या सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा केलेला पत्ता कट; दु:ख व्यक्त करत म्हणाली, “मी निर्मात्यांना फोन…”
punha kartvya aahe
पुन्हा कर्तव्य आहे: आकाश आणि वसुंधराचं नातं मोडलं! प्रोमो पाहून प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…
Shashank Ketkar
“फक्त ७ वर्षं झाली…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता शशांक केतकरची पत्नीसाठी खास पोस्ट; म्हणाला…
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल; ‘या’ बहिणींचे पैसे बंद होणार?

पारू मालिकेचा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “आदित्यचं बोलणं ऐकून पारू खोलवर दुखावली जाणार….”, अशी कॅप्शन दिली आहे.

पारू या मालिकेत पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर हे एक सधन कुटुंब आहे. या कुटुंबात मारुती वाहनचालक म्हणून काम करतो. पारू त्याची मुलगी आहे. अहिल्यादेवी किर्लोस्करने या कुटुंबाला नेहमीच मदत केल्यामुळे त्यांना तिच्याविषयी आदर आहे. पारू अहिल्यादेवीला देवी मानते. पारू त्यांच्या कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडरही आहे. प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगवेळी आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. ती घटना पारू खरी समजून, आदित्यला तिचा नवरा मानते; पण आदित्य तिला चांगली मैत्रीण मानतो. आता मात्र अनुष्का आदित्यच्या आयुष्यात आली आहे. त्यामुळे पारू दु:खी दिसत आहे.

हेही वाचा: “फक्त ७ वर्षं झाली…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता शशांक केतकरची पत्नीसाठी खास पोस्ट; म्हणाला…

दरम्यान, अनुष्का ही तिची बहीण दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आली आहे. आता पारू आदित्यच्या बोलण्यामुळे दुखावली गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत अनुष्का बदला घेण्यासाठी नक्की काय करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader