Paaru Serial : ‘झी मराठी’च्या ‘पारू’ मालिकेत सध्या कंपनीच्या लोगोवरचे डोळे नेमके कोणत्या मुलीचे आहेत याचा शोध आदित्य घेत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. तर, दुसरीकडे ‘पारू’ला एका कागदावर तिचं चित्र रेखाटलेलं दिसतं. यामुळे ते डोळे दुसऱ्या-तिसऱ्या मुलीचे नसून तिचे स्वत:चे आहेत याची खात्री पारूला पटते.
पारूच्या मनात एक वेगळाच विचार सुरू असतो. “आदित्य सरांना जेव्हा कळेल की, हे डोळे माझेच आहेत… तेव्हा ते मैत्री सुद्धा तोडून टाकतील कारण, आपली लायकीच नाही. माणसाने नेहमी पायरी ओळखून राहावं. बाबा म्हणतात तसं… काजव्याने सूर्याची बरोबर करू नये” भावनिक होऊन असे नकारात्मक विचार ‘पारू’च्या मनात चालू असतात. त्यामुळे आदित्यपासून त्या लोगोवरच्या डोळ्यांची ओळख लपवायची असा निर्णय पारू घेते.
‘पारू’ संपूर्ण ड्रेस घालून आणि संपूर्ण चेहरा लपवून आदित्यसमोरून जात असते. चेहरा झाकल्यामुळे आदित्यला तिला, मला एकदा तुम्हाला पाहायचंय अशी विनंती करतो. पण, पारू काहीच न बोलता हात जोडून आदित्यसमोरून निघून जाते. पारू जात असताना आदित्य तिच्या पायातील पैंजण बरोबर ओळखतो आणि तेव्हाच ती पारू असल्याची खात्री त्याला पटते.
गेल्या वर्षभरात ज्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर मालिकेत पाहायला मिळणार आहे. पायातील पैंजण पाहून कंपनीच्या लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत, ती मुलगी ‘पारू’च आहे हे आदित्यला समजतं. तो म्हणतो, “हाच तो क्षण, हेच ते वळण जेव्हा डोळ्यांनी डोळ्यांना ओळखलं. ती मुलगी पारूच आहे.”
दरम्यान, ‘पारू’ मालिकेत हा विशेष भाग येत्या २४ आणि २५ मार्चला ‘झी मराठी’वर ही मालिका संध्याकाळी ७:३० वाजता पाहायला मिळणार आहे.