उद्योग-व्यवसायात अग्रस्थानी असणारे किर्लोस्कर कुटुंब. पैशाने श्रीमंत असलेल्या या कुटुंबाकडे अहंकार मात्र नाही, असे झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पारू’ (Paaru) या मालिकेत पाहायला मिळते. घरातील नोकर-चाकर, त्यांच्यासाठी काम करणारी माणसं यांना ते चांगली वागणूक देतात. कोणाचाही अपमान करणाऱ्याच्या हेतूने काहीही करत नाहीत. या घरात अहिल्यादेवी किर्लोस्कर व श्रीकांत किर्लोस्कर ही वडीलधारी माणसे आहेत.

घरातील सर्व निर्णय त्यांच्या सहमतीने होतात. या जोडप्याला आदित्य व प्रितम ही दोन मुले आहेत. प्रितमचे नुकतेच प्रियाशी लग्न झाले आहे, तर सध्या आदित्यच्या लग्नाची तयारी सुरू आहे. किर्लोस्करांच्या घरात काम करणारी पारू ही त्यांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे. पारू या कुटुंबासाठी खूप काही करताना दिसते. आता त्यांच्या आयुष्यात अनुष्का आली आहे. तिच्या येण्याने खूप समीकरणे बदललेली पाहायला मिळत आहेत. आता अनुष्कामुळे किर्लोस्करांच्या घरावर मोठं संकट येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
tharala tar mag audience upset about new track of the serial
खूप बोअर करताय, ठरवून ताणलेली मालिका अन्…; ‘ठरलं तर मग’चा नवीन ट्रॅक पाहून प्रेक्षक नाराज! पुढे काय घडणार?

‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला किर्लोस्कर कुटुंबाने तुरुंगात पाठवलेली दिशा दिसत आहे. दिशाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. ती तुरुंगात कोणाशीतरी बोलताना दिसते. दिशासमोर अनुष्का बसलेली पाहायला मिळत आहे. अनुष्का दिशाला म्हणते, “अहिल्या आणि श्रीकांत किर्लोस्करांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर त्याला प्रपोज केलं. सगळ्यांचा हिशोब होणार. तुझी बहीण तुझ्या अपमानाचा व सगळ्यांचा बदला घेणार.” अनुष्काच्या या बोलण्यावर दिशा म्हणते, “सगळ्यात आधी ती पारू.”

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्का घेणार बहिणीच्या अपमानाचा बदला!”, अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

‘पारू’ मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रतिक्रिया संमिश्र असल्याचे दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी मालिकेच्या कथानकावर भाष्य केले आहे, तर काहींनी अभिनेत्री श्वेता राजनच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

एका नेटकऱ्याने म्हटले, “अहिल्याची मैत्रीण, तिची मुलगी दिशा. तिला बहीण आहे हे अहिल्याला माहीतसुद्धा नाही. काहीतरी तारतम्य असू देत.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “आम्हाला सगळं माहीत असतं”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “पारू घराची मालकीण आहे की कामवाली हेच कळत नाहीये”, एका नेटकऱ्याने म्हटले, “ती जेलमध्ये भेटायला गेलेली तेव्हाच कळालं आता पुढच्या मालिकेची वाट लागणार. आता अनुष्का काहीतरी करणार त्यातूनसुद्धा किर्लोस्करांना पारुच वाचवणार, चालू देत काय चालतेय ते!”

नेटकऱ्यांनी अभिनेत्री श्वेता राजनला टॅग करत लिहिले, “अनुष्का तू उत्तम काम केलंस. काय परफॉर्मन्स आहे, मार्केट खाल्लं पोरीनं”, असे म्हणत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत; तर एका नेटकऱ्याने पूर्वा राजेंद्र शिंदे व श्वेता राजन यांना टॅग करत ‘प्रेम प्रेम प्रेम’ असे लिहिले आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, दिशाचे प्रितमबरोबर लग्न ठरले होते. मात्र ती त्याच्यासाठी फक्त पैशांसाठी लग्न करत होती. प्रितमचे लग्न ठरल्यानंतर प्रिया त्याच्या आयुष्यात येते व ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रितम व दिशाच्या लग्नादिवशीच पारू व आदित्य दिशाचे सत्य सर्वांसमोर आणतात. अहिल्यादेवी तिला तुरूंगात जाण्याची शिक्षा देते. प्रिया व प्रितमच्या लग्नाला मान्यता देते. आता अनुष्का बहिण दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आलेली पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा? म्हणाला, “शेवटचे दोन चित्रपट अन्…”

दरम्यान, ‘पारू’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे, त्यामुळे आता मालिकेत आलेल्या नवीन वळणामुळे पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली पाहायला मिळत आहे.