टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनतात. काही मालिका तर प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. त्यापैकी एक म्हणजेच पारु ही मालिका होय. कमी कालावधीत ‘पारु'( Paaru ) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना पाहायला मिळत आहे. आता ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पारु मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘पारु’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अहिल्यादेवी आपल्या भावाला राखी पाठवताना दिसत आहे. ते पाहून श्रीकांत तिला तू आणखी किती दिवस अशी राखी पाठवणार? असे विचारताना दिसत आहे. त्याचवेळी अहिल्यादेवीच्या भावाची झलक या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवीच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून तो सुनील बर्वे आहे.

प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे, अहिल्यादेवी आपल्या भावाला राखी पाठवताना दिसते. त्यावेळी श्रीकांत तिला तू अशाप्रकारे राखी आणखी किती दिवस पाठवणार, असे विचारतो. त्यावर अहिल्यादेवी, मला विश्वास आहे, एक ना एक दिवस त्याचा राग शांत होईल आणि तो मला माफ करेल, असे म्हणते.महत्त्वाचे म्हणजे, प्रिया आणि अहिल्यादेवीच्या भावाचा म्हणजेच सुनील बर्वे साकारत असलेल्या पात्राचा एकत्र फोटो यामध्ये पाहायला मिळाला आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना रक्षाबंधन विशेष भाग,अहिल्या पाठवणार भावाला राखी, का दुरावलीत ही जुनी नाती, नियती बांधणार का भावा-बहिणीच्या तुटलेल्या नात्याची गाठ? असे झी मराठीने म्हटले आहे.

आता प्रोमो बघितल्यानंतर, सुनील बर्वेची एन्ट्री होणार म्हणून चाहते खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. याबरोबरच, अहिल्यादेवी आणि त्यांच्या भावामध्ये कोणत्या कारणांमुळे अबोला आहे, कोणत्या कारणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, असे प्रश्न प्रेक्षकांना पडताना दिसत आहे.

हेही वाचा: शाहरूख खान म्हणाला, “मला ओळखत नसाल तर गुगल करा”, आता गुगलने दिली खास प्रतिक्रिया, वाचा काय घडलं?

नेटकरी काय म्हणाले?

‘पारु’ मालिकेत नवीन ट्विस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट करत, “आता मालिका पाहण्यास आणखी मजा येणार’ असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सुनील बर्वे यांची मालिकेत एन्ट्री झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. याबरोबरच सुनील बर्वेची मालिकेत झालेल्या एन्ट्रीमुळे मालिकेत काय बदल होणार आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru marathi serial new promo sunil barve entry raksha bandhan special new twist watch video nsp