‘पारू'(Paaru) या मालिकेत सतत नाट्यात्मक घडामोडी घडताना दिसतात. कधी आदित्यवर संकट येते, तर कधी अनुष्का पारूविरूद्ध कट कारस्थान करते. सध्या अनुष्काने अहिल्यादेवीचे मन जिंकल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच अनुष्का व आदित्यची लग्नगाठ बांधली जाणार आहे. या सगळ्यात आता पारूकडून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हे पद काढण्यात अनुष्काला यश आलेले पाहायला मिळत आहे. आदित्यच्या अनुपस्थितीत हे सगळे होत आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदित्य पत्रकार परिषदेदरम्यान पोहोचला असल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हे पद मी कायमचे…

पारू मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अहिल्यादेवी किर्लोस्करने एक पत्रकार परिषद बोलावली आहे. पारूऐवजी नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ही अनुष्का असेल हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये पारू पत्रकार परिषदेत बोलताना दिसत आहे. ती म्हणते, ” त्यामुळे मी हे जाहीर करते की किर्लोस्कर कंपनीमधील माझं ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हे पद मी कायमचे सोडत आहे.” त्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणते, “किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर अनुष्का आहे.” त्यावर अनुष्का हसून प्रतिसाद देताना दिसत आहे. अहिल्यादेवी ज्यावेळी ही घोषणा करीत असते, त्याचवेळी आदित्य तिथे येत असल्याचे दिसत आहे. अहिल्याचे वक्तव्य ऐकून त्याला धक्का बसतो व तो काय? असे म्हणतो.अहिल्यादेवी हाताने शांत राहण्याचा इशारा करते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आदित्य पारूकडून हे पद हिरवलं जाण्यापासून थांबवू शकेल का ?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, हे सर्व अनुष्काने घडवून आणले आहे. मात्र, पारूची तिने मदत केली आहे, असे तिने भासवले आहे. तिला किर्लोस्कर कुटुंबाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांच्या आयुष्यात आली आहे.अनुष्का ही दिशाची बहीण आहे. दिशाने प्रीतमबरोबर प्रेमाचे नाटक केले होते. चांगले असण्याचे नाटक करीत अहिल्यादेवीचा विश्वास जिंकला होता. मात्र, प्रीतमलाला ती आवडत नव्हते. त्याचे प्रियावर प्रेम होते. अहिल्यादेवीने मात्र प्रितम व दिशाचे लग्न लावण्याचा हट्ट धरला होता. शेवटी पारू व आदित्य यांनी एकत्र दिशाचे सत्य प्रीतम व दिशाच्या लग्नादिवशीच सर्वांच्या समोर आणले होते. त्यावेळी अहिल्यादेवीने दिशाला तुरूंगात पाठवले होते. आता अनुष्का दिशाच्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी किर्लोस्करांच्या आयुष्यात आली आहे.

हेही वाचा: Video: उमेश कामतने घेतली ‘ही’ बाईक; पत्नी प्रिया बापटसह केली पूजा, व्हिडीओ शेअर करत दाखविली पहिली झलक

आता आदित्य अनुष्काच्या प्लॅनमध्ये फसणार का, पारू पुढे काय करणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru marathi serial will aaditya be able to save paarus brand ambassador post nsp