टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या असतात. काही मालिका या रोजच्या जीवनाचा भाग बनतात.मालिकेतील एक भाग संपल्यानंतर दुसऱ्या भागात काय होणार, ही उत्सुकता असल्याने प्रेक्षक पुढचा भाग प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट बघत असतात. या मालिकांमधील एखादे पात्र प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचे बनते, एखाद्या पात्राचा तिरस्कार केला जातो. मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतात. आता येणाऱ्या काळात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.
झी मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये लीला, तुळजा, सावली, पारू, भावना, शिवा दिसत आहेत. त्यांच्यामागे होळी दिसत आहे. लीला म्हणते, “या होळीला प्रेमाने मनं जिंकली जाणार”, भावना म्हणते, “सत्याचा विजय होणार”, पारू म्हणते, “दृष्टांचा संहार होणार”, जान्हवी म्हणते, “खोट्याचा पडदा फाश होणार”, शिवा म्हणते, “जो नडणार त्याला फोडणार”, सावली म्हणते, “अन्यायाला वाचा फुटणार”, तुळजा म्हणते, “बस झालं सहन करणं, आता युद्ध होणार.”
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की लीला, पारू, शिवा एकत्र उभ्या आहेत. पारू म्हणते, “आता खलनायिकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडणार. कारण…” , पुढे शिवा म्हणते, “होळीची आग पेटणार नाही, भडकणार”, लीला म्हणते, “आता महासंगम नाही महासंग्राम होणार”, त्यानंतर सर्व अभिनेत्री एकत्र येत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना अभिनेत्रींच्यामागे होळी दिसत आहे. १५ व १६ तारखेला हे एपिसोड ७ वाजता पाहता येणार आहेत.
झी मराठीवरील सर्व मालिकेतील नायिका खलनायिकांविरोधात एकत्र येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. सावळ्याची जणू सावलीमधील प्रेमळ सावली, शिवा मालिकेतील धाडसी शिवा, लक्ष्मी निवास मालिकेतील समजदार असणाऱ्या भावना व जान्हवी, पारू मालिकेतील सर्व संकटांना धैर्याने सामोरी जाणारी पारू, सूर्याची साथ देण्यासाठी वडिलांच्याविरोधात जाणारी लाखात एक आमचा दादा मालिकेतील तुळजा, नवरी मिळे हिटलरमधील स्वत:च्या स्वभावाने सर्वांची मने जिंकणारी लीला होळी निमित्ताने एकत्र येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
दरम्यान, या सर्वच मालिकांमध्ये काही ना ट्विस्ट आल्याचे दिसत आहे. पारू मालिकेत दिशा व अनुष्काचे कारस्थान लवकरच सर्वांसमोर येणार असल्याचे दिसत आहे. तर लक्ष्मी निवास मध्ये जयंतने त्याचा खरा चेहरा दाखवण्यास सुरूवात केली आहे. तुळजाचा तिच्या वडिलांविरूद्ध लढा कायम आहे. तर नवरी मिळे हिटलरला मालिकेत नुकताच लीलावर हल्ला झाला होता. त्यामुळे तो कोणी केला होता, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सावळ्याची जणू सावली मालिकेत एकीकडे सावली व सारंगमध्ये मैत्री होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अस्मी पुन्हा त्यांच्या आय़ुष्यात येणार असल्याचे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळाले. शिवा मालिकेत शिवाला तिच्या सासरी राहण्याची सिताईकडून परवानगी तर मिळाली आहे. पण, आता किर्ती पुढे काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.