‘पारू'(Paaru) ही मालिका आता नवीन वळण घेताना दिसत आहे. पारू व आदित्यच्या आयुष्यात अनुष्काची एन्ट्री झाल्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिशाने प्रीतम व संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबाला फसवून, त्यांच्या पैशांसाठी प्रीतमबरोबर लग्न करण्याचा प्लॅन केला होता. मात्र, आदित्य व पारू या दोघांनी एकत्र येत, दिशाचे कारस्थान सर्वांसमोर आणले. त्यानंतर अहिल्यादेवी किर्लोस्करने दिशाला तुरुंगात पाठवले होते. आता आदित्य व पारू यांच्या आयुष्यात आलेली अनुष्का ही दिशाची बहीण आहे. दिशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ती त्यांच्या आयुष्यात आली आहे. आता ती आदित्यला त्रास देणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आदित्यला त्रास देण्यासाठी अनुष्का काय करणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पारू’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पारूचे वडील तिला सांगतात, “आतापर्यंत तू जशी अहिल्यादेवींची सेवा करीत होतीस, तशीच तू अनुष्का मॅडमचीदेखील सेवा करायला पाहिजे.” या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, अनुष्का आदित्यच्या खोलीमध्ये आली आहे. आदित्यच्या खोलीतील एक ग्लास घेते, ज्यामध्ये सुकलेले फूल आहे. ते दाखवत अनुष्का आदित्यला म्हणते, “हे असं सुकलेलं फूल पाहण्यापेक्षा मी आणलेली फ्रेम पाहा ना तू.” त्यावर आदित्य तिच्या हातातील तो ग्लास घेतो आणि तो पुन्हा आहे त्या ठिकाणी ठेवत, अनुष्काने आणलेली फ्रेम तिच्या हातात देत म्हणतो, “पारूने आणलेलं फ्रेश फूल बघायला मला खूप आवडतं.” त्यानंतर आदित्य तिथून निघून जातो. त्यानंतर तिथे सुकलेल्या फुलाऐवजी नवीन फुललेले फूल ठेवलेले असते. अनुष्का म्हणते, “आदित्य किर्लोस्कर तुझा माज जिरवून, तुला माझ्या पायाशी आणण्यासाठी मी काहीही करू शकते. तू बघच मी काय करते ते. तेही या दोन दिवसांत.” असे म्हणत ती रागाने ग्लासमधील फूल घेते आणि खराब करते.”

Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
tharla tar mag fame sayali kusum and madhubhau dances on bollywood song
फिर भी ना मिला सजना…; ‘ठरलं तर मग’ फेम सायली, कुसुम अन् मधुभाऊंचा जबरदस्त डान्स! ‘ते’ गाणं ऐकून नेटकरी म्हणाले…
Mumbai University TYBCom semester 5 result announced
तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर
zee marathi new serial laxmi niwas harshada khanvillkar and tushar dalvi in lead role
‘झी मराठी’वर सुरू होणार ‘लक्ष्मी निवास’! हर्षदा खानविलकर अन् तुषार दळवी प्रमुख भूमिकेत, पाहा पहिला प्रोमो
puneri pati puneri poster viral about Funny poster about Toilet in farm warning on social media
पुणेकरांचा विषय हार्ड! शेतात लावली अशी पाटी की पुढे जायची कोणी हिंमत करणार नाही; वाचून पोट धरून हसाल
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos
asha bhosle sings trending gulabi sadi song
Video : गुलाबी साडी…; ९१ व्या वर्षी आशा भोसलेंचा जबरदस्त अंदाज! हुकस्टेप करत गायलं संजू राठोडचं ट्रेडिंग गाणं

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आदित्यला त्रास देण्यासाठी अनुष्का रचणार नवा सापळा”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे अहिल्यादेवी व श्रीकांत किर्लोस्कर यांना दोन मुलगे असून, आदित्य व प्रीतम अशी त्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रीतमचे प्रियाबरोबर लग्न झाले. त्यानंतर आदित्यच्या लग्नाची सर्वांना चिंता लागली होती. त्यांनी आदित्यसाठी विविध स्थळे पाहण्यास सुरुवात केली होती. तितक्यात अनुष्काने त्यांच्या आयुष्यात एन्ट्री केली. अतिशय हुशार, यशस्वी उद्योजक, संयमी, धाडसी, निर्णयक्षमता असणारी, सुंदर अशी अनुष्का आदित्यसाठी अगदी योग्य आहे यावर संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबीयांचे एकमत झाले. आता लवकरच आदित्य व अनुष्काचे लग्न होणार आहे.

हेही वाचा: इंजिनियरिंग करून अभिनय क्षेत्रात यायचं ठरवल्यावर घरच्यांचा पाठिंबा होता का? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली…

आदित्यचा आयुष्यात येण्याचा अनुष्काचा खरा हेतू सर्वांना समजणार का, मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

Story img Loader