‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक आणि प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली ‘पारू’ मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आता घराघरात पोहोचला आहे. फक्त पारू, आदित्य, अहिल्यादेवीचं नाही तर इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अनुष्का.

अभिनेत्री श्वेता खरातने अनुष्का हे पात्र साकारलं आहे. याच अनुष्काने म्हणजे श्वेताने नवीन आलिशान घर खरेदी केल्याचं समोर आलं आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. श्वेताने नवीन घरातील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने आपल्या कुटुंबाबरोबर नवीन घरात गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेताचे आई-बाबा आणि भाऊ पाहायला मिळत आहे. या आनंदाच्या दिवशी श्वेताने खास लूक केला होता. तिने केशरी रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. श्वेताच्या नवीन घरातील गृहप्रवेशा दिवशी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाणने खास हजेरी लावली होती. याचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

श्वेता खरात इन्स्टाग्राम स्टोरी
श्वेता खरात इन्स्टाग्राम स्टोरी

अभिनेत्री श्वेता खरातने नवीन घराची आनंदाची बातमी देताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अभिनेत्री अक्षया नाईक, स्वाती देवल, जुई बेंडखळे, सुमित पुसावळे, मुग्धा कर्णिक अशा अनेक कलाकारांनी श्वेताला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच चाहत्यांच्यादेखील प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दरम्यान, श्वेता खरातच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने मालिकांबरोबर चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘पारू’ मालिकेआधी ती ‘मन झालं बाजिंद’, ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकांमध्ये पाहायला मिळाली होती. तसंच श्वेता ‘तुला पण बाशिंग बांधायचंय’, ‘143’ चित्रपटांमध्ये झळकली होती. सध्या ‘पारू’ मालिकेतील श्वेताने साकारलेली अनुष्का प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

Story img Loader