Paaru Serial Upcoming Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका दिवसेंदिवस रंजक होत आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. सध्या प्रेक्षकांचं प्रीतमच्या लग्नाकडे लक्ष लागलं आहे. प्रीतम आईच्या मर्जीनुसार दिशाशी लग्न करणार की जीवपाड प्रेम असणाऱ्या प्रियाशी लग्नगाठ बांधणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रिया नेमकी कोणाची मुलगी आहे याचा खुलासा झाला. हे ऐकून प्रीतमला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण प्रीतमचं प्रेम असलेली प्रिया ही दुसरी तिसरी कोणी नसून अहिल्यादेवीचा सख्या भाऊ सयाजी राव भोसलेची मुलगी असते. हे स्वतः प्रिया प्रीतमला सांगते. तेव्हापासून प्रीतम व प्रियाच्या नातं टिकेल की नाही? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अशातच प्रीतमला साथ देण्यासाठी आदित्य आणि पारू पुढे आले आहेत.
हेही वाचा – Video: “आर्या जळतेय…” निक्की तांबोळी व अरबाज पटेलचं ‘ते’ कृत्य पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, आदित्य प्रियाला म्हणतो की, माझा भाऊ तुझ्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या वतीने मी तुला विचारतो, प्रीतमबरोबर लग्न करशील का? त्यानंतर पारू प्रियाला विचारते, “काय झालं? तुमचं लग्न तुमच्या घरच्यांनी दुसऱ्या कोणाबरोबर ठरवलं आहे का?” त्यावर प्रिया म्हणते, “माझे बाबा या लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत.” हे ऐकून आदित्य आणि पारूला धक्का बसतो. त्यामुळे आता आदित्य व पारू प्रीतम-प्रियाचं लग्न होण्यासाठी काय करणार? अहिल्यादेवी व सयाजी राव भोसले प्रीतम-प्रियाचं नातं स्वीकारणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता येत्या भागातच मिळणार आहेत.
हेही वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये डाव पलटला, ‘बिग बॉस’ने घेतला धक्कादायक निर्णय, पाहा नवा प्रोमो
दरम्यान, ‘पारू’ मालिकेत ( Paaru Serial ) अहिल्यादेवीचा भाऊ सयाजी राव भोसले या भूमिकेत अभिनेते सुनील बर्वे झळकले आहेत. सुनील बर्वे यांची मालिकेत दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. अहिल्यादेवी व सयाजी राव भोसले यांच्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला आहे. सयाजी अहिल्यादेवीवर नाराज असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण यामागचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.