Paaru Serial Upcoming Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अलीकडेच मंगळागौरचा कार्यक्रम झाला. पारूने तिची लग्नानंतरची पहिली मंगळागौर केली. यावेळी मंगळागौरचं पूजन करताना पारू पकडली जाणार होती, पण तिला सावित्रीने थोडक्यात वाचवलं. अहिल्यादेवीने सावित्री आत्याची मंगळागौर करण्यासाठी या खेळाचा घाट घातला होता. सध्या किलोस्कर कुटुंबात रक्षाबंधन साजरे होताना दिसत आहे. यावेळी पारूला आदित्यबरोबर भावा-बहिणीच्या बंधनात अडकवण्यासाठी दामिनीचा नवा डाव पाहायला मिळत आहे. पण पारू आदित्यला राखी बांधणार की नाही? किंवा आदित्य पारूकडून राखी बांधून घेणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच मालिकेत लवकरच नात्यांचा नवा अध्याय पाहायला मिळणार असल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पारू’ मालिकेचा ( Paaru Serial ) नवा प्रोमो ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामधून प्रितमची प्रेयसी प्रिया नेमकी कोण आहे? हे समोर आलं असून यामुळे प्रितमला आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रितम व प्रियाच्या लव्हस्टोरीमुळे दुरावेली नाती जवळ येतील की आणखी फूट पडले? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. नेमकं प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलं आहे, जाणून घ्या…

प्रितम आणि प्रियाच्या लव्हस्टोरीमुळे मालिकेच येणार जबरदस्त ट्विस्ट

Paaru Serial ( Photo Credit – Zee Marathi )

हेही वाचा – “त्यांच्या नखाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही”, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळेच्या अपमानावरून शिव ठाकरेची पोस्ट, म्हणाला…

प्रोमोमधून प्रिया ही अहिल्यादेवीचा सख्या भाऊ सयाजी राव भोसलेची मुलगी असल्याचं उघड झालं आहे. प्रोमोमध्ये प्रितम म्हणतो, “प्रिया मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी आताच जाऊन आईला सगळं सांगतोय.” त्यावर प्रिया म्हणते, “थांबा प्रतिम सर, तुम्ही सांगाल अहिल्या मॅडमना. पण माझ्या आबांचं काय?” मग प्रितम विचारतो, “कोण आहेत तुमचे आबा?”

तेव्हा प्रिया सांगते, “सयाजी राव भोसले. खऱ्याबरोबर नेहमी उभे राहणारे आणि खोट्याला आयुष्यात जागा न देणारे.” हे ऐकून प्रितमला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यामुळे आता प्रितम आणि प्रियाच्या लव्हस्टोरीमुळे जुनी नाती जुळतील की आणखी दुरावतील? हे येत्या भागात पाहणं रंजक असणार आहे.

हेही वाचा – Video: “मगरमच्छ के आंसू…”, जान्हवीने रडत पंढरीनाथ कांबळेची माफी मागितल्यावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, ‘पारू’ मालिकेत ( Paaru Serial ) अहिल्यादेवीचा भाऊ सयाजी राव भोसले या भूमिकेत अभिनेते सुनील बर्वे झळकले आहेत. सुनील बर्वे यांची मालिकेत दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. अहिल्यादेवी व सयाजी राव भोसले यांच्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला आहे. सयाजी अहिल्यादेवीवर नाराज असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण यामागचं नेमकं कारण काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru serial upcoming episode pritam girlfriend priya truth will come out pps