Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका यावर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत नेहमीच रंजक वळणं येत असतात. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेचा टीआरपी सुद्धा चांगला आहे. अशातच आता ‘पारू’मध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री कोण आहे याबद्दल जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झी मराठी’ वाहिनीने दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा पाठमोरा व्हिडीओ शेअर करत ‘पारू’ मालिकेत लवकरच एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर सगळ्या नेटकऱ्यांनी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती. अनेकांनी तिला पहिल्याच टीझरमधून अचूक ओळखलं देखील होतं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून यापूर्वी ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी श्वेता खरात आहे.

हेही वाचा : अवघ्या ३ महिन्यांत बंद होणार ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय मालिका! मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

‘पारू’ मालिकेत आलीये नवीन खलनायिका

श्वेता ‘पारू’ ( Paaru ) मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. तिच्या पात्राचं नाव अनुष्का असं आहे. निळ्या रंगाची साडी, त्यावर कोट, कमरेला पट्टा, मोकळे केस असा स्टायलिश लूक करून श्वेताची मालिकेत एन्ट्री होणार आहे. तिच्या एन्ट्रीचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘पारू’ ( Paaru ) मालिकेत एका १०० वर्षं जुन्या पेंटिंगचं ऑक्शन सुरू असतं. यावेळी “अनुष्का मॅमला ही पेंटिंग नक्की आवडेल” अशा चर्चा सुरू होते. अहिल्यादेवी सुद्धा याठिकाणी उपस्थित असते. अनुष्काच्या नावाची चर्चा ऐकून अहिल्या म्हणते, “ही अनुष्का कोण आहे? या मुलीला आता मला एकदा भेटलंच पाहिजे” पुढे, पेंटिंगच्या ऑक्शनला सुरुवात होते. अहिल्यादेवी पहिली बोली १ करोड लावते. यानंतर अनुष्का या पेंटिंगवर १ करोड २५ लाखांची बोली लावते आणि पेंटिंग खरेदी करते. पुढे, अहिल्या तिला म्हणते, “महागात पडला तुला हा सौदा…” यावर अनुष्का म्हणते, “मी सौदा करायला तुमच्याकडूनच शिकलीये” आता हा सौदा नक्की कोणाला महागात पडणार हे मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा : या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी

दरम्यान, मालिकेत ( Paaru ) श्वेताची एन्ट्री झाल्यावर नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru serial zee marathi shweta kharat entry as a lead villain watch new promo sva 00