दर आठवड्याला मालिकांचा टीआरपी रिपोर्ट येत असतो. ऑनलाईन टीआरपी आणि टेलिव्हिजन टीआरपी अशा दोन प्रकारचे रिपोर्ट येतात. सध्या टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. कारण आजकाल टीआरपीच्या गणितावरच मालिका अधिक काळासाठी सुरू ठेवायची की नाही? हे ठरवलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून अशा अनेक मालिका बंद करण्यात आल्या आहेत, ज्यांचा टीआरपी चांगला नव्हता. त्यामुळे या टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात.

गेल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. नेहमीप्रमाणे टॉप-१०मध्ये ‘स्टार प्रवाह’च्या मालिका आहेत. पण विशेष म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीच्या नव्या मालिका जुन्या मालिकांवर वरचढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’वर सुरू झालेल्या नव्या मालिकांचा टीआरपी वाढलेला दिसत आहे.

footpaths of Lakshmi Road are once again crowded with street vendors and vehicles
लक्ष्मी रस्त्याचा श्वास पुन्हा कोंडला…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Barsu oil refinery project
बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली
industrial production
औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित
Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

हेही वाचा – Video: ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाण्यावर मनमोहक अदाकारी करणारी ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री कोण? ओळखा पाहू

‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवर गेल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘झी मराठी’च्या नव्या मालिका ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांनी जुन्या मालिकांना मागे टाकल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शरयू सोनावणे व अभिनेता प्रसाद जवादे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पारू’ मालिका टीआरपीच्या यादीत १५व्या स्थानावर असून २.७ रेटिंग मिळाले आहेत. तसेच अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल्व किंजवडेकर मुख्य भूमिका असलेली ‘शिवा’ मालिका १९व्या स्थानावर आहे. या मालिकेला २.४ रेटिंग मिळाले आहे. त्याच्याच खालोखाल ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका आहे.

अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका २०व्या स्थानावर असून २.४ रेटिंग मिळाले आहे. त्यानंतर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिका आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा टीआरपी घसरला असून ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेचा टीआरपी स्थिर आहे.

हेही वाचा – Video: ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत जबरदस्त वळण, खोट्या अर्जुन मागचा मास्टमाईंड आहे ‘हा’ चेहरा

टॉप-१० मालिका

१) ठरलं तर मग
२) लक्ष्मीच्या पाऊलांनी
३) प्रेमाची गोष्ट
४) तुझेच मी गीत गात आहे
५) घरोघरी मातीच्या चुली
६) सुख म्हणजे नक्की काय असतं
७) साधी माणसं
८) प्रेमाची गोष्ट – महाएपिसोड
९) घरोघरी मातीच्या चुली – महाएपिसोड
१०) अबोली

Story img Loader