‘पारू’ (Paaru) या मालिकेत सतत काही ना काही नवीन घडताना पाहायला मिळते. सध्या मालिकेत किर्लोस्करांच्या घरात सगळ्यांनाच आदित्यच्या लग्नाचे वेध लागलेले पाहायला मिळत आहे. सगळे जण त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. किर्लोस्करांच्या आयुष्यात जेव्हापासून अनुष्का आली आहे, तेव्हापासून तिच्या नावाने घरातील सर्व आदित्यला चिडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदित्यच्या बोलण्याचा पारूला बसला आश्चर्याचा धक्का

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, पारू आदित्यला विचारते की, मुलगी पसंत पडली आहे का एखादी? आदित्य म्हणतो, “माझं लग्न झालेलं असताना मुलगी शोधायचा विषय येतोच कुठे?” पारू आश्चर्यचकित होऊन, काय? असं म्हणते. यावर आदित्य म्हणतो, काय, काय, काय पारू? आपलं लग्न झालंय ना? अख्ख्या जगानं बघितलंय. मग परत माझ्या लग्नाचा संबंधच काय? आदित्यचे हे बोलणे ऐकून पारू अवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पारू इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आदित्यच्या या बोलण्यामागचा काय हेतू असेल?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आदित्य हा श्रीकांत आणि अहिल्या कर्लोस्करचा मोठा मुलगा आहे. हे कुटुंब श्रीमंत आहे. त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकर आहेत. ड्रायव्हर्स आहेत. पारू ही त्यांच्या मारूती नावाच्या ड्रायव्हरची मुलगी आहे. तीसुद्धा किर्लोस्करांच्या घरी काम करते. ती त्यांच्या कंपनीच्या एका प्रॉडक्टची ब्रॅंड ॲम्बेसेडर होते. याच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये आदित्य पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. पारू त्या सगळ्याला खरं समजते. ती आदित्यला नवरा मानते. मात्र, आदित्य तिला फक्त मैत्रीण समजतो. पारू किर्लोस्करांच्या घरातील सर्व कामे मोठ्या सूनेची जबाबदारी म्हणून करते. आदित्यची काकू पारूवर सतत संशय घेत असते आणि तिला त्रास देण्याकरिता विविध गोष्टी करत असते. पारू मात्र किर्लोस्करांच्या घरातील सर्वांना आनंदित ठेवण्यासाठी, काळजी घेण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी परिश्रम घेताना दिसते.

हेही वाचा: “एका काकूंनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली अन्…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने सांगितला किस्सा, म्हणाला, “हा यश…”

आता आदित्य असे का म्हणत आहे, आदित्यचे लग्न कोणाबरोबर होणार, पारू पुढे काय करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.