‘पारू’ (Paaru) मालिका वेगळ्या कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अहिल्यादेवीच्या घरी नोकर म्हणून काम करणारी गरीब घरातील मुलगी पारू प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते. आपल्या प्रेमळ स्वभावाने पारू अहिल्यादेवीच्या घरातील सर्वांची लाडकी होते. आदित्यला वेळोवेळी मदतदेखील करते आणि त्याच्या प्रेमात पडते. एका जाहिरातीसाठीच्या शूटिंगमध्ये आदित्य तिला मंगळसूत्र घालतो आणि पारू ते सर्व सत्य समजते. त्यानंतर ती आदित्यला नवरा मानते आणि घरातील मोठी सून म्हणून सर्व कर्तव्य पार पाडते. मात्र, आदित्य किंवा इतर कोणालाही याबद्दल कोणतीही कल्पना नसून तो तिला फक्त चांगली मैत्रीण मानतो. आता झी मराठीने या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पारू पुन्हा एकदा घरची मोठी सून होण्याचे कर्तव्य पार पाडणार असल्याचे दिसत आहे.

प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय

झी मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रिया प्रीतमला ऑफिसला जाण्याबाबत सांगताना दिसत आहे. ती म्हणते, “आदित्य सर आणि मोहन काका जातात ना दररोज ऑफिसला, मग आता तुम्हीसुद्धा जायचं.” त्यावर प्रीतम म्हणतो, “मी काय करू ऑफिसला जाऊन?” प्रिया म्हणते, “हा बिझनेस तुमचासुद्धा आहे, तुम्हाला माहीत पाहिजे ना सगळं? त्यांचा हा संवाद पारू ऐकत आहे. त्यानंतर पारू म्हणते, “पण, माझ्या मनासाठी तरी या घरची मोठी सून म्हणून किर्लोस्कर कुटुंब हे इथून पुढे एकत्र दिवाळी साजरी करणार, ही जबाबदारी या पारूची.”

tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tula shikvin changalach dhada zee marathi serial bhuvaneshwari re enters in the show
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Zee Marathi Awards 2024 full Winners List Part 1 and Part 2
Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
zee marathi awards sharmishtha raut
‘झी मराठी’च्या दोन लोकप्रिय मालिकांची निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत! पुरस्कारांचा फोटो शेअर करत म्हणाली, “सलग दुसरं वर्ष…”
झी मराठी इन्स्टाग्राम

झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना, “पारू किर्लोस्कर कुटुंबाला दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र आणणार…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: ‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”

दरम्यान, मालिकेत दाखवल्याप्रमाणे प्रीतम आणि प्रियाचे नुकतेच लग्न झाले आहे. आता अहिल्यादेवीला आदित्यसाठी मुलगी शोधायची आहे, त्यासाठी ती प्रयत्न करताना दिसते. आता मालिकेत पुढे काय होणार, पारू आदित्यला तिचा नवरा मानते ही गोष्ट सगळ्यांना कळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader