नाटक, चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशा सगळ्या माध्यमांत अनेक नाट्यमय घटना घडताना दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते. प्रेम, गूढता, गुन्हेगारी, रहस्य अशा अनेकविध विषयांवरील कथानके प्रेक्षकांना खिळवून ठेवत असतात. तर काही कथानकांत सामान्य माणसांच्या आयुष्यासारख्याच साध्या साध्या गोष्टींचे प्रसंग वा घटना सामावलेल्या असतात. त्यामध्ये येणारी रंजक वळणे प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात. यामधील चांगल्या-वाईट घटना, सकारात्मक-नकारात्मक पात्रे प्रेक्षकांना भुरळ घालतात. आता पारू (Paaru) या लोकप्रिय मालिकेत प्रीतमवर मोठे संकट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रीतमचा संताप अनावर

झी मराठी वाहिनीने पारू या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, प्रीतम व प्रिया बाहेर फिरण्यासाठी गेले आहेत. प्रीतम प्रियाला पाणीपुरी आणून देतो. ते दोघेही आनंदात दिसत आहेत. तितक्यात काही गुंड तिथे येतात. त्यातील एक जण म्हणतो, “आम्हालासुद्धा भरव ना पाणीपुरी.” त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रीतमचा संताप अनावर झाल्याचे दिसत आहे. तो त्याला चिडून म्हणतो, “तू, फालतूगिरी करू नकोस.” त्यानंतर ते गुंड प्रीतमला मारहाण करू लागतात. प्रिया, त्याला मारू नका, असे म्हणत ती प्रीतमला सोडविण्यासाठी पुढे जाते; पण तिला एक गुंड बाजूला ढकलून देतो.

दुसरीकडे आदित्य व पारूमध्ये काहीतरी बोलणे सुरू असते. तितक्यात आदित्यचा फोन वाजतो. तो फोन प्रियाचा असतो. प्रिया आदित्यला रडत रडत सांगते की, आदित्यदादा, प्रीतमला इथे गुंडांनी पकडलं आहे आणि ते त्याला मारत आहेत. हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर तणाव दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना, “सुरू झालाय किर्लोस्करांसोबत जीवघेणा खेळ”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, किर्लोस्कर कुटुंबाला त्रास देण्यासाठी, त्यांचा बदला घेण्यासाठी अनुष्का त्यांच्या आयुष्यात आली आहे. आदित्य व अनुष्काचे लवकरच लग्न पार पडणार आहे. त्याबरोबरच अनुष्का पारू व प्रीतमला अनेकदा त्रास देताना दिसते. आता हा हल्ला नक्की कोणी घडवून आणला आहे, आदित्य प्रीतमला गुंडांच्या ताब्यातून सोडवू शकणार का, अनुष्का दिशाची बहीण असल्याचे सत्य केव्हा समोर येणार, पारूचे भवितव्य काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.