मालिकेत पुढे काय होणार, याची सतत प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली दिसते. आवडत्या मालिकेतील आवडत्या पात्रांबरोबर पुढे काय होणार, कथानक कोणते नवीन वळण घेणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. काही मालिका या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेल्या दिसतात. अशाच लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे पारू(Paaru). पारू या मालिकेला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतो. मालिकेतील पात्रे, तसेच कथानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
पारू आदित्यला ‘धनी’ म्हणत लाजणार…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, नानू व पारू एकत्र असून, ते एकमेकांशी बोलताना दिसत आहे. पारू नानूला म्हणते, “नानू, पिवळी फुलं असतील ना?” यावर उत्तर देताना नानू म्हणतो, “होय.” पारू त्याला प्रेमाने विचारते की, मग जाशील का? त्यावर नानू लगेच जातो, असे म्हणतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, नानू एका झाडाच्या बुंध्यावर झोपला आहे. तिथे आदित्य येतो आणि त्याला जागे करतो. आदित्य नानूला विचारतो, “नानू, पारू कुठेय?” त्यावर नानू हातातील फूल दाखवत म्हणतो, “ही पिवळी फुलं हुडकायला मी जंगलात गेलो. मी परत आलो, तर ती तिथे नव्हतीच.” त्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर आदित्य त्याच्यावर चिडून म्हणतो, “तू तिला एकटीला कसं काय सोडलंस?” या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, नानू त्याची सायकल व हातात फूल घेऊन परत येतो. तो पोहोचता क्षणीच अनुष्का त्याला विचारते की, आदित्य त्याच्या खोलीत नाहीये. कुठे गेलाय तो? नानू म्हणतो की, ते गेले जंगलात माझ्या पार्वतीबरोबर. पुढे दिसते की, आदित्य ‘पारू’, अशी हाक मारत जंगलातून फिरत आहे. पारूला आदित्य दिसतो; मात्र ती त्याची मजा घेताना दिसत आहे. आदित्यने पारू म्हणून हाक मारल्यावर ती ‘धनी’ असे मोठ्या आवाजात म्हणताना दिसत आहे. प्रोमोच्या शेवटी ती लाजतानादेखील दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करीत झी मराठी वाहिनीने, “आदित्यला पारूची काळजी; पण पारूला शोधू शकतील का तिचे धनी…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रणाणे, पारू किर्लोस्कर कुटुंबात नोकर म्हणून काम करते. पण, त्यांच्या एका प्रॉडक्टसाठी तिची ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून निवड झाली आहे. या प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये आदित्यने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. पारू हे खरे लग्न समजते आणि तेव्हापासून ती आदित्यला नवरा मानते. मात्र, दुसरीकडे आदित्य तिला चांगली मैत्रीण मानतो. आता आदित्यचे अनुष्काबरोबर लग्न ठरले आहे.
े
मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे.