टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग असतात. आपल्याला आवडणाऱ्या मालिकांच्या पुढच्या भागात काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. आता झी मराठी वाहिनीने पारू (Paaru) मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून पारू या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये प्रीतमच्या लग्नावरून अहिल्याबाई-दिशा आणि पारू, आदित्य, प्रीतम व प्रिया असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

tula shikvin changlach dhada adhipati and charulata meet each other
Video : अखेर तो क्षण आला! मायलेकाची भेट होणार, अधिपती – चारुलता आले समोरासमोर, मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
zee marathi new serial savlyachi janu savali
‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार! ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका, पाहा प्रोमो
paaru and aditya dance on old marathi song
Video : “रुपेरी वाळूत माडांच्या बनात…”, पारू अन् आदित्यचा जबरदस्त डान्स! दोघांच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष
zee marathi savlyachi janu savali marathi serial starcast
तारीख अन् वेळ ठरली! ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी; अप्पी ऑफएअर होणार?
Paaru Serial Upcoming Episode Aditya will support Pritam and Priya affair
Video : आदित्य आणि पारू देणार प्रीतमच्या प्रेमाला साथ पण…; नेमकं काय घडणार? पाहा नवा प्रोमो
sara kahi tichyasathi marathi serial off air soon
वर्षभरानंतर ‘झी मराठी’ची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा
tharala tar mag new promo
ठरलं तर मग : प्रियाने धक्का मारताच सायली जिन्यावरून घसरली! बायकोला बेशुद्ध पाहताच अर्जुन बिथरला…; पाहा नवीन प्रोमो

दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचे खरे प्रेम, कोण जिंकेल ही प्रेमाची लढाई…?

प्रोमोच्या सुरुवातीला दिशा आणि अहिल्या यांच्यामध्ये संवाद चालू असून, दिशा अहिल्याला म्हणते, “माझ्या आणि प्रीतमच्या लग्नाला आता फक्त २० दिवस बाकी आहेत. आमचं लग्न व्यवस्थित पार पडेल ना?” त्यावर अहिल्या दिशाचा हात हातात घेते आणि म्हणते, “दिशा, मी तुला वचन देते. तुझं आणि प्रीतमचं लग्न मी निर्विघ्नपणे पार पाडेन.” तर दुसऱ्या दृश्यात पाहायला मिळते की, प्रिया, प्रीतम, पारू व आदित्य हे एकत्र आले असून, आदित्य प्रीतमला वचन देत म्हणतो, “तुझं आणि प्रियाचं लग्न मी निर्विघ्नपणे पार पाडेन.”

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “दिशाचा खोटा चेहरा की प्रीतमचं खरं प्रेम, कोण जिंकेल ही प्रेमाची लढाई…?” अशी कॅप्शन दिली आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

मालिकेत दाखविल्याप्रमाणे अहिल्याने आपल्या लहान मुलाचे लग्न दिशाबरोबर ठरवले आहे. दिशा प्रीतमबरोबर त्याच्या पैशांसाठी लग्न करीत आहे. दुसरीकडे प्रीतमला पहिल्यापासूनच दिशा आवडत नाही; परंतु आईच्या शब्दासाठी तो लग्नासाठी तयार होतो. मात्र, काही दिवसांनी प्रिया त्याच्या आयुष्यात येते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रिया अहिल्याच्या ऑफिसमध्ये कामाला होती; मात्र दिशा आणि तिच्यामध्ये वाद झाल्यानंतर तिने दिशाला सज्जड दम देत, तिचा हात पिरगाळला होता. ते पाहिल्यानंतर अहिल्याने तिला कामावरून काढून टाकले. त्यामुळे प्रीतम फार दुखावला गेला. दिशाने तिच्या मित्राच्या मदतीने त्याला भरपूर दारू प्यायला लावून अहिल्यासमोर म्हणजेच त्याच्या आईसमोर त्याला वाईट ठरवले. त्यानंतर प्रीतमने प्रियाला लग्नाची मागणी घातली असल्याचे मालिकेत दाखवले गेले आहे.

हेही वाचा: Video : देसी गर्ल प्रियांका चोप्रासह पहिल्यांदाच काम करणार आदिनाथ कोठारे! माध्यमांसमोर आले एकत्र, व्हिडीओ व्हायरल

आता प्रीतमचे लग्न नक्की कोणाबरोबर होईल, आदित्य व पारू प्रीतमला प्रियाबरोबर लग्न करण्यासाठी कशी मदत करतील, त्यासाठी त्यांना कोणती कसरत करावी लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, दिशा अहिल्यासमोर आपण चांगले असल्याचे नाटक करते, तिचा चेहरा सगळ्यांसमोर येणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.