‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव, ओंकार भोजने यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत असतात. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारा शो म्हणून याची ओळख आहे. विशाखा सुभेदार, ओंकार भोजने यानंतर आता पंढरीनाथ कांबळे हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने रामराम केला. तो झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ साठी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंढरीनाथ कांबळे हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत अतो. त्याच्या विनोदीबुद्धीचे कायमच कौतुक केले जाते. आता लवकरच तो झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवायला सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाचे काही प्रोमोही समोर आले आहेत. ज्यात तो इतर कलाकारांबरोबर गंमतीजमती कराना दिसत आहे. मात्र नुकतचं त्याने एका मुलाखतीत त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम का सोडला याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : विशाखा सुभेदारपाठोपाठ आणखी एका विनोदवीराची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’मधून एक्झिट, चर्चांना उधाण

पंढरीनाथ कांबळे याने नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मला एकाच संचात काम केल्यामुळे एकसुरीपणा येतो. म्हणूनच मी मध्यंतरी नाटक केलं. चित्रपटांचीही कामं सुरु होती. काही वैयक्तिक अडचणींमुळे एखादा शो थांबवावा लागतो किंवा एखाद्या शोला आपली गरज नाही; असं आपल्याला वाटायला लागतं. त्यामुळे कोणीतरी आपल्याला ‘जा’ म्हणण्यापेक्षा आपण स्वतः थांबलेलं बरं असतं.”

“यानंतर आता मी काही दिवस विश्रांती घेत होतो. त्यावेळी मला ‘फू बाई फू’ कडून विचारणा करण्यात आली. नव्या सहकलाकारांबरोबर नव्या संचात काहीतरी नवीन करण्याच्या हेतूनं मी हा कार्यक्रम स्वीकारला. पूर्वीचा शो सोडताना कोणावरही राग रोष अजिबात नाही”, असे स्पष्टीकरण पंढरीनाथ कांबळेने दिले.

आणखी वाचा : “काठी टेकत टेकत का होईना…” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरु होणार आहे. या कार्यक्रमाला २०१० मध्ये सुरुवात झाली होती. हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. हा कार्यक्रम २०१४ मध्ये बंद झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु होणार आहे. याद्वारे प्रेक्षकांचे पोट दुखेपर्यंत मनोरंजन होणार आहे. या कार्यक्रमात अनेक विनोदवीर एकत्र मंचावर झळकणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy kamble talk about why he left from maharashtrachi hasyajatra show reason nrp