पाकिस्तानमध्ये एक नवा रिअॅलिटी शो सुरु होत आहे. पण हा शो सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानने भारतीय रिअॅलिटी शोची कॉपी केली असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कलर्स हिंदी वाहिनीवरील ‘फिअर फॅक्टर’ हा शो तुम्हा सगळ्यांना आठवतच असेल. या शोमध्ये स्पर्धक सहभागी होत विविध स्टंट करताना दिसतात. पाकिस्तानने आता हाच भारतीय शो कॉपी केला आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘द अल्टीमेट मुकाबला’ (The Ultimate Muqabla) नावाचा शो पाकिस्तानमध्ये सुरु होत आहे. पण या शोचा प्रोमो पाहता भारतीय शो ‘फिअर फॅक्टर’ची तुम्हालाही आठवण येईल. विशेष म्हणजे क्रिकेटपटू शोएब मलिक या शोचं सुत्रसंचालन करणार आहे. त्यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शोचा प्रोमो शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ
तसेच ‘आजतक’च्या वृत्तानुसार या शोमध्ये सहभागी होणारी स्पर्धक मरियम नफीसने याबाबत अधिक माहिती दिली आहे. “थायलंडमध्ये जून व जुलै महिन्यामध्ये या शोचं चित्रीकरण झालं आहे. तसेच शोएब मलिक या शोचा सुत्रसंचालक असणार आहे. ‘द अल्टीमेट मुकाबला’ शो हा पाकिस्तानी शो ‘मॅडवेन्चरस’चं दुसरं वर्जन आहे.” असं मरियमने सांगितलं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “अरे ए किरण माने तुला…” अपूर्वा नेमळेकरची दादागिरी सुरुच, राग अनावर झाला अन्…
‘द अल्टीमेट मुकाबला’ हा शो पाकिस्तानमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा शो असल्याचंही बोललं जात आहे. या शोमध्ये १४ स्पर्धक सहभागी होणार आहेत. १५ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या शोने भारतीय शोची कॉपी केली असली तरी त्याला प्रेक्षकांचा कितपत पसंती मिळणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.