‘झी मराठी’वरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. अनिता दाते, पल्लवी पाटील आणि कश्यप परुळेकर हे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. अभिनेत्री पल्लवी पाटील हिने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आता तिने तिच्या लहानपणीची एक आठवण शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पल्लवी पाटील हिने आधी चित्रपटांमध्ये काम केले होते. तर ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. या मालिकेत ती आनंदीची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिचे काम प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेमुळे तिचा चाहतावर्गही खूप वाढला आहे. पल्लवीही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आता एका मुलाखतीमध्ये ती लहान असताना घरातले पैसे चोरायची, असा खुलासा तिने केला आहे.

आणखी वाचा : अदिती सारंगधरने ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरला केलं होतं प्रपोज, लव्ह लेटरमध्ये लिहिलेल्या मजकूराबद्दल खुलासा करत म्हणाली…

‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ती तिच्या बालपणीची आठवण सांगताना म्हणाली, “मला लहान असताना खूप वाईट सवय लागली होती. आमच्या घरी अक्षय्यतृतीयेला पैसे लावून पत्ते खेळतात. माझे काका वगैरे ते खेळायचे आणि ते मी बघायचे. हा एकाच दिवसाचा खेळ असतो आणि मजा म्हणून आम्हीही खेळायचो. तेव्हा मी ते पैसे डब्यातून चोरायचे. आमच्या घरी दुपारी जेवण झाले की सगळे तासभर झोपायचे. त्या वेळामध्ये मी माझ्या सर्व बहिणींना एकत्र गोळा करायचे आणि ते पैसे चोरून घेऊन जायचे.”

हेही वाचा : “मला तो प्रचंड आवडतो आणि…,” क्रशचं नाव सांगत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने व्यक्त केली मनातली इच्छा

पुढे ती म्हणाली, “मी हे करीत असताना एकदा पकडले गेले होते. माझ्या आईने मला पैसे चोरताना पाहिले होते. त्या वेळी मी आईला माझी बाजू मांडताना सांगितले होते की, मी दोन रुपये चोरते पण खेळताना मी पाच रुपये जिंकते. तीन रुपये मी जास्त आणून देते. माझ्या या बोलण्यावर मी आईचा खूप मार खाल्ला होता.” आता तिच्या या बोलण्यावर तिचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pallavi patil revealed she used to steal money from their home in childhood rnv