Akshay Kharodia Divorce: टीव्ही विश्वातून एक वाईट बातमी आली आहे. ‘पंड्या स्टोअर’ फेम टीव्ही अभिनेता अक्षय खरोडियाने लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. अक्षयने त्याच्या लग्नातील फोटो शेअर करून ही माहिती दिली. या जोडप्याला दोन वर्षांची मुलगी रुही आहे, तिचं संगोपन दोघेही मिळून करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय खरोडियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आणि लिहिलं, “जड अंतःकरणाने, मला एक अत्यंत वैयक्तिक गोष्ट शेअर करायची आहे. खूप विचार करून आणि चर्चा करून मी आणि दिव्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांसाठी हा अत्यंत कठीण निर्णय होता. दिव्या माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आमच्यातील प्रेम, आनंदाचे क्षण आणि आठवणी माझ्यासाठी नेहमीच अनमोल राहतील. एकत्र आम्हाला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे आमची मुलगी, रुही. ती नेहमीच आमच्यासाठी सर्वस्व असेल.”

हेही वाचा – नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावर विश्वास असलेल्या स्पर्धकाला विचारले असे प्रश्न, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; पाहा Video

अक्षय खरोडिया, दिव्या व त्यांची लेक रुही (फोटो – इन्स्टाग्राम)

अक्षयने सांगितलं की तो व दिव्या सह-पालक म्हणून मुलीचे संगोपन करतील. “आम्ही हा निर्णय घेतोय, पण रुहीशी आमची बांधिलकी कायम असेल. तिला तिच्या दोन्ही पालकांचे प्रेम, काळजी आणि पाठिंबा नेहमीच मिळेल. आम्ही आदर व प्रेमाने तिचे सह-पालक राहू,” असं अक्षयने लिहिलं.

हेही वाचा – कंगना रणौतने एक्स बॉयफ्रेंडच्या मुलीला पहिल्याच चित्रपटात केलेलं रिप्लेस; झरीना वहाबचा मोठा खुलासा, म्हणाली…

अक्षय खरोडियाची पोस्ट –

“आमच्या कुटुंबासाठी हा एक सोपा क्षण नाही, आणि आम्ही या कठीण काळातून जात असताना आम्ही तुमच्याकडून समजूतदारपणा आणि गोपनीयतेची आशा करतोय. कृपया आम्हाला या घटस्फोटासाठी नाही तर आम्ही शेअर केलेल्या प्रेम आणि आनंदासाठी लक्षात ठेवा,” असं अक्षयने लिहिलं.

अक्षय खरोडिया हा ‘सुहागन’ व ‘पंड्या स्टोअर’ या मालिकांसाठी ओळखला जातो. तसेच त्याने ‘नोटरी’, ‘अवस्थी व्हर्सेज अवस्थी’ व ‘कँडी ट्विस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandya store fame actor akshay kharodia divorce wife divya after 3 years of marriage hrc