परेश रावल हे बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परेश स्वतःचं मत कायम निर्भीडपणे मांडत असतात. राजकीय भूमिका घेणं किंवा मत मांडणं यामुळे परेश रावल हे कायम चर्चेत असतात. मुंबईत एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या परेश यांना लहानपणापासूनच नाटकाची आवड होती. १९७४ मध्ये कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली.

हेही वाचा- मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघात, अजूनही घाबरलेल्या अवस्थेत आहे म्हणत प्रकृतीविषयी दिली माहिती

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”

चित्रपटातून प्रसिद्धी मिळाल्यानंतरही परेश रावल यांचं नाटकावरील प्रेम कमी झालेलं नाही. आजही त्यांना कोणत्याही मुलाखतीमध्ये जेव्हा नाटकाबद्दल किंवा रंगभूमीबद्दल विचारणा होते तेव्हा ते त्याबद्दल भरभरून बोलतात. नुकतंच परेश रावल यांनी ‘कोण होणार करोडपती’ या मराठी रियालिटी शोमध्ये हजेरी लावली. या वेळी त्यांच्यासह नाटकाची सेंचुरी पार करणारे मराठी दिग्दर्शक विजय केंकरेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच कार्यक्रमात परेश रावल यांनी मराठी नाटकात काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे.

मराठी नाटकात आजपर्यंत काम का केलं नाही यावर ते म्हणाले, “मला मराठी भाषेचा तितका सराव नाही. मी या भाषेचा खूप आदर करतो. मी काही चुकीचं बोललो तर ते पाप होईल असं मला वाटतं. जर मी सराव केला तर नक्कीच मराठी नाटकात काम करू शकतो. पण चुकीचं बोलायला नको म्हणून मी यापासून थोडं लांबच असतो.”

हेही वाचा- संकर्षण कऱ्हाडे गडबडीत चढला होता लेडीज डब्यात आणि… ; अभिनेत्याने शेअर केला ‘तो’ किस्सा

मराठी नाटकाबाबतही परेश रावल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत, ते म्हणाले. “मराठी रंगभूमी ही सतत काही ना काही तरी नवीन देत आली आहे. नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार नाटकं मराठीत पाहायला मिळतात. शिवाय मराठी नाटकांचा जो दर्जा असतो त्यातून बरंच काही शिकायला मिळतं.”

Story img Loader