गेल्या काही महिन्यांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका बंद होण्याचा एक प्रकारे सपाटाच सुरू आहे. ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिका टीआरपीच्या कारणास्तव अवघ्या काही महिन्यातच बंद करण्यात आल्या. त्यानंतर आता लवकरच ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण दुसऱ्या बाजूला आता नवनवीन विषयावर आधारित मालिका ‘झी मराठी’वर सुरू होणार आहे. ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावरील पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामधून नव्या दोन मालिका जाहीर करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या आठवड्यात म्हणजेच ४ डिसेंबरपासून ‘झी मराठी’ वाहिनीवर एक अफलातून संकल्पना असलेला ‘जाऊ बाई गावात’ हा रिअ‍ॅलिटी शो सुरू झाला. हार्दिक जोशी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्यामुळे आता आणखी एक रिअ‍ॅलिटी शो ‘झी मराठी’वर सुरू होणार आहे. ‘ड्रामा Juniors’ असं नव्या रिअ‍ॅलिटी शोचं नाव आहे. अशातच आता दोन नव्या मालिकेची भर पडली आहे. लवकरच ‘झी मराठी’वर या दोन नव्या मालिका सुरू होणार आहे.

हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”

‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. मनसोक्त हसणारी ‘पारू’ आणि बिनधास्त जगणारे ‘शिवा’… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी…एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ लवकरच ‘झी मराठी’वर, असं या प्रोमोमधून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता नव्या रिअ‍ॅलिटी शोसह या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या नव्या मालिका काय असणार आहेत? कोणते कलाकार झळकणार आहेत? कधीपासून सुरू होणार आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मिळणार आहेत.

हेही वाचा – नातीचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन भारावले, सोशल मीडियावर पोस्ट करत आराध्याविषयी म्हणाले, “अभिमानास्पद क्षण…”

दरम्यान, ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा २३ डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. तर ‘३६ गुणी जोडी’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होण्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paru and shiva two new serial coming soon on zee marathi pps