New Marathi Serial: गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नवनवीन मालिकांची घोषणा केली जात आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या नवीन कथा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘तू ही रे माझा मितवा’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ आणि ‘अशोक मा.मा’ मालिकांनंतर आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नव्या मालिकेची घोषणा ‘सन मराठी’ वाहिनीने केली आहे. ‘जुळली गाठ गं’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेत्री पायल मेमाणे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप मालिकेची घोषणा झाली असून कधीपासून मालिका प्रसारित होणार आणि वेळ? गुलदस्त्यात आहे. पण, मालिकेच्या दमदार प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता आणि शिवानी सोनार लवकरच अडकणार लग्नबंधनात, बॅचलर पार्टीचे फोटो आले समोर

हेही वाचा – व्याहीभोजन! ‘शिवा’चा आशू खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार; होणारी पत्नी काय काम करते? जाणून घ्या…

‘जुळली गाठ गं’ या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना कोणती जुनी मालिका निरोप घेणार? याची उत्सुकता लागली आहे. तर काही नेटकऱ्यांनी पायल मेमाणेला शुभेच्छा दिल्या आहेत. आता या नव्या मालिकेत पायलसह आणखी कोणते कलाकार झळकणार? आणि कोणती जुनी मालिका ऑफ एअर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू अडकला लग्नबंधनात, किंशुक वैद्यचं मराठी रितीरिवाजानुसार झालं लग्न; फोटो आले समोर

दरम्यान, अभिनेत्री पायल मेमाणेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची…’ मालिकेत झळकली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. ४०० हून अधिक भाग या मालिकेचे प्रसारित झाले होते. याआधी पायल ‘कलर्स मराठी’च्या ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय तिने ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘अप्सरा आली’ कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal memane new serial julali gath g coming soon watch promo pps