टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता तिने बिग बॉस १६ चा स्पर्धक साजिद खानचं समर्थन केलं आहे. ‘मी टू’ चळवळीत गंभीर आरोप लागल्याने साजिद खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. साजिद खान बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला सातत्याने विरोध केला जात आहे. अशाच पायल रोहतगीने लांबलचक पोस्ट लिहून साजिदला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर तिने अभिनेत्री मंदाना करीमीला चांगलंच फटकारलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साजिद खान बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाल्यानंतर बराच वाद झाला आहे. शहनाझ गिल आणि कश्मीरा शाह यांच्यानंतर आता पायल रोहतगीने साजिद खानला समर्थन दिलं आहे. पायलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील पोस्टमध्ये लिहिलं, “साजिद खानने ६ महिलांसह गैरवर्तन केलं. जे त्याने सार्वजनिकरित्या कबुल केलं. सर्वांनी त्याला त्यावरून सुनावलं, त्याच्यावर टीका झाली, त्याला अपमानित करण्यात आलं. आता या सहा महिला त्याला न्यायालयात नेऊ शकतात. पण महात्मा गांधी यांच्या मूल्यांनुसार हत्या करणाऱ्या माणसालाही सुधरण्यासाठी एक संधी दिली जाते. तर मग इथे साजिदलाही जगण्याचा अधिकार आहे. त्याला पैसे कमावण्याचा अधिकार आहे. त्याला पश्चाताप करण्याचा अधिकार आहे. त्याला त्याच्या अधिकारांसाठी लढू द्या. तुम्ही त्याला विरोध करा, पण बॉलिवूड सोडण्याचं नाटक करू नका.”

आणखी वाचा-Bigg Boss 16 : साजिद खान बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉलिवूडला रामराम, कारण देत म्हणाली…

याशिवाय पायलने तिच्या पोस्टमध्ये मंदाना करीमीला उत्तर दिलं आहे. मंदानाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी जागा नाहीये, इथे महिलांचा आदर केला जात नाही. यावर पायलने लिहिलं, “तू तर इराणमध्येही राहू नकोस कारण तिथेही महिलांचा सन्मान केला जात नाही.” तसेच आपल्या पोस्टमध्ये लॉकअप शो संपल्यानंतर मंदानाने तिचं मानधन न मिळाल्याचं आरोप केल्याबाबतही पायलने तिच्यावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- ‘बिग बॉस’च्या घरात साजिद खानला पाहून भडकली उर्फी जावेद, म्हणाली “लैंगिक शोषण करणाऱ्या…”

दरम्यान २०२१ मध्ये पायल रोहतगीने साजिद खानबाबत बरीच वक्तव्य केली होती. त्यावेळी पायलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साजिदच्या अटकेची मागणीही केली होती. पण आता मात्र ती साजिदला पाठिंबा देताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payal rotago support to sajid khan says let him fight for his rights mrj