‘बिग बॉस’ हिंदीच हे १६वं पर्व सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच हे पर्व यंदाच्या स्पर्धकांमुळे चर्चेत आलं होतं. हे पर्व संपायला शेवटचे काही तास उरले आहेत. आज या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. यंदाची ट्राफिक कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं दिसत आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे व्हावा असंच सगळ्यांना वाटतं. पण आता एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात शिव ठाकरे नाही तर प्रियांका चहर चौधरी ‘बिग बॉस १६’ची विजेती झाल्याचं दिसत आहे.

गेल्या आठवड्यात घरातून मिड वीक एव्हिक्शन झालं असून त्यात निम्रत कौर घराबाहेर पडली. आता शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरी या चार जणांमध्ये ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. प्रेक्षकांच्या मतांनुसार या स्पर्धेत प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि स्टॅन हे टॉप ३ स्पर्धक आहेत. पण आता शिव आणि स्टॅनला मागे टाकत प्रियांकाने ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकल्याच्या चर्चा एका व्हायरल फोटोमुळे सुरु झाल्या आहेत.

Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
balya dance traditional folk dance from kokan
Video : कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय… बाल्या डान्स एकदा पाहाच, Video होतोय व्हायरल
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
American Jessica Pegula advances to US Open women singles final sport news
पेगुलाची अंतिम फेरीत धडक, मुचोव्हावर मात; आता अरिना सबालेन्काचे आव्हान
muslim man attacked for allegedly selling beef
Bihar Crime News : गोमांस विकल्याच्या संशयावरून मुस्लीम व्यक्तिला मारहाण; १९ जणांवर गुन्हा, दोघांना अटक
Netflix Kandahar hijacking series controversy
IC-814: The Kandahar Hijack: कंदहार हायजॅक वेबसीरीजमध्ये अतिरेक्यांची हिंदू नावे; वाद उफाळल्यानंतर नेटफ्लिक्सनं दिलं उत्तर
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल

आणखी वाचा : Bigg boss 16: “तो हा खेळ खेळला नाही तर…” ग्रँड फिनालेपूर्वी शिव ठाकरेच्या अकाउंटवरून केली गेलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात शिव ठाकरे आणि प्रियांका हे टॉप २ स्पर्धक असल्याचं दिसत आहे. तर या फोटोमध्ये सलमान खानच्या एका बाजूला शिव आणि दुसऱ्या बाजूला प्रियांका उभी असलेली दिसत आहे. यात सलमानने दोघांचेही हात धरले असून त्याने प्रियांकाचा हात विजेती स्पर्धक म्हणून उंचावला आहे. या फोटोवरून प्रियांका शहर चौधरी ‘बिग बॉस १४’ची विजेती आहे असं बोललं जाऊ लागलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss 16: प्रियांका चहर चौधरीच्या फीमध्ये दुपटीने वाढ, आता आठवड्याला आकारते ‘इतके’ मानधन

पण हा फोटो खरा नाही. हा फोटो बिग बॉसच्या १४व्या पर्वातील आहे. जेव्हा राहुल वैद्य आणि रुबीना दिलैय ‘बिग बॉस १४’चे टॉप २ स्पर्धक होते त्या वेळेचा हा फोटो आहे. या पर्वात रुबीना विजेती ठरली होती. आता तो फोटो एडिट करून त्यावर शिव आणि प्रियांकाचे चेहरे लावण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना प्रियांका बिग बॉस १६ ची विजेती ठरल्याचं वाटत आहे. पण तसं खरंच होणार का हे आता काही वेळातच स्पष्ट होईल.