Bigg Boss Marathi 5 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अरबाज पटेल कमी मतं मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वी शोमधून बाहेर पडला आहे. तो बिग बॉसमध्ये असताना त्याच्या आणि निक्की तांबोळीच्या मैत्रीची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. तो जेव्हा घराबाहेर पडला त्यावेळीदेखील त्याला त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावर त्याने दिलेल्या उत्तरांची मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आता अरबाज पटेलने एका मुलाखतीत निक्कीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनला आहे.

काय म्हणाला अरबाज पटेल?

अरबाज पटेलने नुकतीच ‘इन्स्टंट बॉलीवूड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की, अरबाजने शोसाठी निक्कीचा वापर केला. बाहेर आल्यानंतर ते वेगळे होतील, असे प्रेक्षकांनी म्हटले, तर यावर तू काय सांगशील? अरबाजने यावर बोलताना म्हटले, “पहिली गोष्ट असे लोकांनी असे म्हटले नाही की अरबाज निक्कीचा वापर करत आहे. सगळीकडे हेच होतं की निक्की गेमसाठी अरबाजचा वापर करत आहे, कारण त्याचा खेळ चांगला आहे. लोकांनी तिला म्हटले आहे. तो एकटा खेळला तर त्याचा गेम अजून चांगला होईल, असे प्रेक्षकांकडून म्हटले गेले आहे.”

पुढे बोलताना त्याने म्हटले, “निक्कीने माझा वापर केला नाही किंवा मीदेखील तिचा खेळासाठी वापर केला नाही. टास्क किंवा इतर गोष्टी असो, मी स्वत:चाच गेम खेळत होतो. तर लोकांनी तिला म्हटले आहे, की निक्की अरबाजचा वापर करत आहे. पण असं नाही. मी माझा खेळ खेळला आहे. निक्की माझ्याबरोबर होती तर माझी दुसरी बाजू बघायला मिळाली. मी काळजी करणारा व्यक्ती, माझी भावनिक बाजू अशा गोष्टी लोकांना पाहायला मिळाल्या आहेत.”

हेही वाचा: “आमच्या हास्यजत्रेवाले हलकट लोक…”, अभिनेता प्रसाद ओक असं का म्हणाला? वाचा…

दरम्यान, अरबाजने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर निक्की बिग बॉसच्या घरात माझ्यासाठी कम्फर्ट झोन होती. तिने त्या घरात माझी बाळासारखी काळजी घेतली आहे, त्यामुळे मी तिच्याबरोबर जोडला गेलो. ती बाहेर आल्यानंतर शोमध्ये वागत होती, तशीच वागली तर आम्ही एकत्र दिसू, असे त्याने म्हटले आहे.

‘बिग बॉस मराठी ५’ चा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. निक्की तांबोळी बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अरबाज पटेलबरोबर तिचे नाते कसे असेल हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.