‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. २०२०पासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं होतं. मालिकेतील कलाकारांना त्या पात्रांद्वारेच ओळखलं जाऊ लागलं होतं. कीर्ती-शुभमची जोडी चांगलीच हीट झाली होती. अभिनेत्री समृद्धी केळकरने कीर्ती ही भूमिका उत्कृटरित्या साकारली होती. त्यामुळे अजूनही समृद्धीला कीर्ती म्हणून ओळखलं जातं. सध्या समृद्धी केळकरच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री समृद्धी केळकरचा २३ डिसेंबरला वाढदिवस होता. हा वाढदिवस तिने कशाप्रकारे साजरा केला, यासंदर्भात अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे. समृद्धीने आपल्या खास दिवशी कुटुंबीयांबरोबर वेळ घालवला. तिने कुटुंबीयांबरोबर देवदर्शन केलं. अक्कलकोटी, तुळजापूर, पंढरपूर या तिन्ही ठिकाणी जाऊन अभिनेत्री नतमस्तक झाली. यावेळी तिने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ज्यावर तिने एक मोठा हार परिधान केला होता. या लूकमध्ये समृद्धी खूपच सुंदर दिसत होती.
हेही वाचा – Bigg Boss 18: चुम दरांग झाली नवी ‘टाइम गॉड’, घरात झाला राडा; करणवीर मेहरा-रजत दलालमध्ये जोरदार भांडण
समृद्धीने देवदर्शनाचे फोटो शेअर करत लिहिलं, “२३/१२ वाढदिवस विशेष…अक्कलकोट,तुळजापूर,पंढरपूर या तिन्ही देवस्थानांचं कुटुंबासह दर्शन घेतलं…याहून सुंदर काय असू शकत…देवा, कायम न मागता सर्व काही देत आला आहेस..असाच कायम पाठीशी राहा…कृतज्ञ…शुभेच्छांचे खूप फोन आणि मेसेज आले…सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य झालं नाही त्यासाठी सॉरी…पण सगळ्यांना मनापासून थँक्यू आणि खूप प्रेम…लव्ह यू ऑल.”
अभिनेत्री समृद्धी केळकरच्या पोस्टवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा”, “तुझी सर्व इच्छा पूर्ण होवो”, “माझी आवडती अभिनेत्री”, अशा प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर उमटल्या आहेत.
हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
दरम्यान, समृद्धी केळकर कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेनंतर समृद्धी सूत्रसंचालन करताना पाहायला मिळाली. ‘स्टार प्रवाह’चा लोकप्रिय कार्यक्रम ‘मी होणार सुपरस्टार’ मध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी समृद्धीवर होती. समृद्धी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी तिचे सुंदर फोटो आणि डान्स व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे ती कायम चर्चेत असते.