Bigg Boss Marathi Season 5 : सलग दुसऱ्या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ रितेश देशमुख शिवाय पार पडत आहे. कामानिमित्ताने परदेशात असल्यामुळे रितेश ‘भाऊच्या धक्क्या’वर गैरहजर आहे. पण ६ ऑक्टोबरला होणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला रितेश देशमुख उपस्थित राहणार आहे, हे शनिवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर स्पष्ट करण्यात आलं. रितेशच्या अनुपस्थितीत ‘भाऊच्या धक्क्या’वर खास पाहुण्यांनी ‘बिग बॉस’ घरात हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी ( २८ सप्टेंबर ) ‘बिग बॉस’ घरात आधीच्या पर्वातील गाजलेले सदस्य खास पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातील अभिजीत बिचुकले, पहिल्या पर्वातील पत्रकार अनिल थत्ते आणि चौथ्या पर्वात गाजलेली राखी सावंत हे खास पाहुणे म्हणून घरात पाहायला मिळाले. यावेळी या पाहुण्यांनी काही सदस्यांचं कौतुक केलं तर काही सदस्यांवर टीका केली. त्यानंतर आजही ( २९ सप्टेंबर ) खास पाहुणे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा – Video: “तुझ्यामध्ये उद्याचे दादा कोंडके दिसतायत”, अनिल थत्तेंनी सूरजचं केलं भरभरून कौतुक; गालावर किस करत म्हणाले, “आय लव्ह यू…”

या प्रोमोमध्ये ‘फुलवंती’ चित्रपटातील कलाकार म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांनी घरातील सदस्यांबरोबर वेगवेगळे टास्क खेळून धमाल केली आहे. ‘भाषाच्या तालावर’ हा खेळ खेळताना गश्मीर आणि अभिजीत सावंत एकत्र डान्स करताना दिसत आहेत. तसंच निक्कीने देखील आपल्या डान्सचा जलावा दाखवला आहे. गश्मीर आणि प्राजक्ताने आणलेला हा ट्विस्ट आजच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर पाहायला मिळणार आहे. रितेश देशमुख गैरहजर असल्यामुळे निलेश साबळे होस्ट करणार आहे.

हेही वाचा – Video: “तुमचं वय झालं” म्हणणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी अनोख्या अंदाजात दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस मराठी’ प्रसारित होण्याची वेळ बदलली

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा दहावा आठवडा हा शेवटचा आठवडा असणार आहे. या अंतिम आठवड्यात काय-काय घडतंय आणि कोण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता होतंय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अंतिम आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’ची वेळ बदलण्यात आली आहे. ३ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’ रात्री ९ वाजता नाही तर रात्री ९.३० वाजता ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार आहे. ९ वाजता ‘कलर्स मराठी’ची नवी मालिका ‘आई तुळजाभवानी’ पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phullwanti movie actress prajakta mali and gashmeer mahajani entry in bigg boss marathi season 5 pps