‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘पिंकाचा विजय असो.’ काही दिवसांपूर्वी या मालिकेचा केंद्रबिंदू असणारी भूमिका ‘पिंकी’ ही बदलली. अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पिंकाचा विजय असो’ मालिकेला अचानक रामराम ठोकून प्रेक्षकांना धक्काच दिला होता. पुन्हा एकदा शरयूने असाच काहीसा धक्का दिला आहे. पण हा धक्का सुखद आहे.
हेही वाचा – “खूप धाडस करुन हे पाऊल उचलते…” ‘ रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचं नव्या क्षेत्रात पदार्पण
हेही वाचा – ‘आरआरआर’नंतर एसएस राजामौली यांनी दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकची केली घोषणा; काय असणार चित्रपटाचं नाव?
अभिनेत्री शरयू सोनावणे हिनं गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं सारखपुड्याची माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शरयूने साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.”
अभिनेत्रीची साखरपुड्याची पोस्ट पाहून कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावर केला आहे. अभिनेता विजय आंदळकर, समृद्धी केळकर, गिरीजा प्रभू, कोमल कुंभार अशा सर्व कलाकार मंडळींनी तिला अभिनंदन केलं आहे.
शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव जयंत लाडे असं आहे. तो एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे. ‘सूर सपाटा’ आणि ‘अ पेईंग गेस्ट’ या चित्रपटांसाठी त्यानं काम केलं आहे.
हेही वाचा – “हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष
दरम्यान, ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत शरयूच्या जागी सध्या अभिनेत्री आरती मोरे पिंकीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. शरयूने मालिकांव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.