‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस करून घेतलं आहे. सावी-अर्जुनची जोडी हिट झाली आहे. अशातच मालिकेतील एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतील बलराम म्हणजे अभिनेता हेमंत फरांदेने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्याने मोनिका हेमंत हिच्याशी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील कलाकार मंडळी उपस्थित राहिली होती. या सर्व कलाकारांनी हेमंतच्या लग्नात धमाल केली. हेमंत व मोनिकाच्या लग्नाचे व्हिडीओ ‘मराठी मनोरंजनविश्व’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Bollywood actor varun Dhawan reveals wife of a powerful man broke into his house without permission
वरुण धवनच्या घरात घुसली होती चाहती, प्रसंग सांगत अभिनेता म्हणाला, “एका पॉवरफुल व्यक्तीची ती पत्नी होती अन्…”
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
devoleena bhattacharjee blessed with baby boy
Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन
marathi actress pratima deshpande baby name
वर्षभरापूर्वी लग्नगाठ बांधणारी मराठी अभिनेत्री झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘अहना’; नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ चर्चेत

हेही वाचा – ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

लग्नासाठी हेमंत व मोनिकाने खास दोन लूक केले होते. सुरुवातीला दाक्षिणात्य लूकमध्ये दोघं पाहिला मिळाले. हेमंतने लुंगी व त्यावर गडद जांभळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. तर मोनिकाने सोनरी रंगाची साडी नेसली होती. या साडीला हेमंतला मॅचिंग करण्यासाठी गडद जांभळ्या रंगाची किनारी होती. त्यानंतर दोघं वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले. सध्या हेमंत व मोनिकाला इतर कलाकार मंडळी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याने शिवानी सोनारसह गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, हेमंत फरांदेची बायको मोनिका मेकअप आर्टिस्ट आहे. तिने काही चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.

Story img Loader