‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ, विचारी, मार्मिक प्रश्नांनी मोठ्यांना अचंबित आणि निरूत्तर करणारी इंदू घराघरात पोहोचली आहे. या चिमुकल्या इंदूने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. पण, आता छोट्या इंदूचा नवा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बालकलाकार सांची भोईरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने छोट्या इंदूची भूमिका साकारली आहे. मालिका सुरू झाल्यानंतर अल्पावधीत छोट्या इंदूने प्रेक्षकांचं मनं जिंकून घेतली. पण, आता लवकरच मोठी इंदू प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘इंद्रायणी’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

नव्या प्रोमोमध्ये पाठिराखा ( अभिनेता संतोष जुवेकर ) मोठ्या इंदूची ओळख करून देताना दिसत आहे. पाठिराखा म्हणतो, “इंदू ताई तुम्ही मोठ्या झालात. आता नव्या आव्हानांसाठी तयार व्हा.” त्यानंतर मोठी इंदू म्हणते, “विठ्ठूराया तू पाठीशी असताना मला कशाची रे भीती?” असा सुंदर प्रोमो सध्या ‘इंद्रायणी’ मालिकेचा चर्चेत आला आहे.

लाडक्या इंद्रायणीचा नवा प्रवास लवकरच सुरू होणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘पिरतीचा वनता उरी पेटला’मध्ये झळकलेली अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंद्रायणीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता इंद्रायणी मालिकेत येत्या काळात नवनवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान, कांची शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, कांचीने ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेत चमकी ही भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली होती. कांची सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती लावणी वर्कशॉप घेते. कांचीने अनेक लावणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या लावणी आणि अदांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. त्यामुळे आता कांचीने साकारलेली इंद्रायणी प्रेक्षकांची मनं जिंकते का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.