अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत अनेक कलाकार उद्योग जगतात पाऊल ठेवतं आहेत. कलाकार मंडळी स्वतःचं कॅफे, हॉटेल, फूड ट्रक सुरू करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने दादरमध्ये नवं हॉटेल सुरू केलं होतं. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील लोकप्रिय संगीत संयोजक व संगीतकार तुषार देवलने पत्नी स्वाती देवलसह स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्याकरिता बोरिवली पूर्व येथे भव्य मिसळ महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात तुषार व स्वातीने ‘देवल मिसळ’ स्टॉल लावला होता. याचं कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर आता तुषार व स्वातीने एक पाऊल पुढे टाकतं स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे.

selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”
Actress Amrita Subhash makes her directorial debut with a play
दिग्दर्शिका…झाले मी!

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनच्या ‘जिजाजी’ने मजेशीर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, गायिका म्हणाली, “अरे काय…”

बोरीवली पूर्वेला तुषार व स्वातीचं ‘देवल मिसळ’ हे नवं हॉटेल आजपासून सर्व खवय्यांसाठी खुलं झालं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते आज ‘देवल मिसळ’ नव्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. पियूष गोयल यांनी खास उपस्थित राहून तुषार व स्वातीला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर फुग्यांनी सजावट केली होती. सध्या तुषार व स्वातीचे मित्रमंडळी, नातेवाईक सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करून दोघांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

शिवाय स्वातीने देखील नव्या हॉटेलविषयी पोस्ट केली आहे. तिने हॉटेलच्या उद्घाटनाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “आज माझं अजून एक स्वप्नं पूर्ण झालं ते म्हणजे माझ्या (देवल मिसळ)चं आउटलेट चालू झालंय…आज केंद्रीय मंत्री पियूष गोयल, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर. प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत देवल मिसळचे अनावरण झाले…आपण सर्वांनी लवकरात लवकर मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर यावे…”

दरम्यान, पियूष गोयल हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते उत्तर मुंबईचे उमेदवार आहेत. भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल यांना उमेदवारी घोषित केली आहे.

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरचं लग्न मोडण्यासाठी सावनीने रचला नवा डाव, कोळी कुटुंबाशी संबंधित असलेल्या ‘या’ व्यक्तीची घेतली मदत

तुषार व स्वाती देवलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तुषार हा नेहमी नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असतो. तर स्वाती देवल लवकरच मुलगा स्वराध्यसह झळकणार आहे. ‘कलर्स मराठी’च्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत स्वाती व स्वराध्य पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी स्वातीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.

Story img Loader