‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे या दोघांचा विवाहसोहळा गेल्यावर्षी ६ डिसेंबर २०२३ रोजी थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित राहिले होते. आज सुरुची लग्नानंतर तिचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पियुषने खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पियुष रानडेने बायकोच्या वाढदिवशी तिला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने सुरुचीबरोबरचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा : ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीला मातृशोक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “आई खूप एकटी पडले गं…”
पियुष लिहितो, “हाय बर्थडे गर्ल, तुझ्या प्रेमामुळे माझं संपूर्ण आयुष्य उजळून निघालं. मी आयुष्यात विचारही केला नव्हता असं प्रेम तू माझ्यावर केलंस. माझ्या चुका, उणीवा माझ्यातील कमतरता लक्षात घेऊन मी जसा आहे तसं मला समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”
हेही वाचा : “दादा, लग्नाचं प्रेम आहे ना?”, ‘असा’ पार पडलेला प्रथमेश परबचा विवाहसोहळा, साधेपणाने वेधलं लक्ष
“आपलं प्रेम ज्याप्रकारे फुलतंय ते पाहून मी खरंच भारावून जातो. या प्रेमाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आय लव्ह यू सुरुची” अशी पोस्ट शेअर करत पियुषने सुरुचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, पियुषने शेअर केलेल्या पोस्टवर श्रेया बुगडे, प्रिया मराठे, अभिज्ञा भावे, आदिश वैद्य, रश्मी अनपट, श्वेता महाडिक यांनी कमेंट्स करत सुरुचीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे सुरुचीला एक वेगळी ओळख मिळाली. याशिवाय पियुष रानडे सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.