मराठी टीव्ही बालकलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईर पोलीस कोठडीत आहे. पूजाला आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मे महिन्यात अटक झाली होती, त्यानंतर तिच्या पोलीस कोठडीत वाढ केली जात आहे. या प्रकरणी तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी साईशाच्या घराची झडती घेतली आहे. आज (५ जुलै रोजी) पोलिसांनी तिच्या कल्याण येथील घरी भेट दिली आणि झडती घेतल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
बालकलाकार साईशा भोईरची आई पोलीस कोठडीत, तर वडील फरार; सगळी संपत्ती होणार जप्त, नेमकं प्रकरण काय?
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक फसवणुकीप्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने पूजाच्या कोठडीत वाढ केली होती. सध्या ती कोठडीत आहे, तर तिचा पती विशांत भोईर फरार आहे. अशातच चौकशीसाठी पोलिसांनी तिच्या कल्याणमधील घरी भेट दिली. तिच्या घरातून आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. पूजाने गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या पावत्या आणि कागदपत्रेही पोलिसांना सापडली आहेत. पूजाकडे २७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते आणि त्यापैकी तिने २६ लाख रुपयांचे दागिने गहाण ठेवले होते.
बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती
बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती
आर्थिक गुन्हे शाखेने आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत आणि शोध मोहिमेच्या वेळी घरी असलेल्या पूजाच्या सासरच्या मंडळींची चौकशीही केली आहे. पूजाच्या सासरच्यांनी पोलिसांसमोर कबूल केले की त्यांनी तिला या व्यवसायात न पडण्याचा सल्ला दिला होता परंतु तिने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
फर्मच्या नावाखाली पूजा आणि तिचा पती विशांत यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. त्यांनी आर्थिक गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पूजाच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलिसांना आढळले आहे.