‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील रोशन सिंग सोढी अर्थात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गुरुचरण सिंग ११ दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरणच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत. २६ एप्रिलपासून त्याचा शोध सुरू आहे, पण अद्याप त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. अशातच गुरुचरणने स्वतःच बेपत्ता व्हायचा बनवा रचला असावा, असा संशय पोलिसांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘न्यूज १८’ ने दिल्लीतील पोलीस सूत्रांच्या हवाल्याने याबद्दल वृत्त दिलं आहे. सूत्र म्हणाले, “त्याने आपला फोन पालम परिसरात सोडून दिला. आम्ही त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न करत आहोत, पण त्याचा शोध घेणं कठीण झालंय कारण त्याचा फोन त्याच्याजवळ नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एका ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात जाताना दिसला. असं वाटतंय जणू तो ठरवून दिल्लीतून बाहेर पडलाय व बेपत्ता झाला आहे.”

११ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंगची थकबाकी दिली होती का? ‘तारक मेहता…’चा निर्माता म्हणाला….

२२ एप्रिलला विमानतळावर जाण्यासाठी निघाला, पण…

२२ एप्रिल रोजी गुरुचरण सिंग शेवटचा दिसला होता. तो मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला, पण दिल्ली विमानळावर पोहोचलाच नाही. तो मुंबईला गेला नाही व घरीही परतला नाही हे कळाल्यावर त्याच्या वृद्ध वडिलांनी २६ एप्रिल रोजी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. “माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय ५० वर्षे, २२ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाला होता. तो विमानतळावर जाण्यासाठी निघाला, पण मुंबईला पोहोचला नाही, घरीही परतला नाही आणि त्याचा फोनही बंद आहे. तो मानसिकदृष्ट्या स्थिर आहे आणि आम्ही त्याचा शोध घेत होतो पण तो सापडत नाहीये,” असं त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं होतं.

“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया

सीसीटीव्ही फुटेज व प्राथमिक तपासात काय आढळलं?

तो बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. गुरुचरण सिंग दिल्लीतील अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. त्याने जवळच्याच एटीएममधून सात हजार रुपये काढले होते.

गुरुचरण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या लग्नाच्या व आर्थिक अडचणीच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण कुटुंबियांनी या सर्व गोष्टी फेटाळल्या होत्या.