छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता या पर्वाच्या आगामी भागात अभिजीत बिचुकले हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे कसे संबंध आहेत ते सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘खुपते तिथे गुप्ते’च्या या पर्वामध्ये आतापर्यंत आतापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या नेते मंडळींनी हजेरी लावली. तर आता राजकारणी अभिजीत बिचुकले या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. या आगामी भागाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आगामी भागात त्यांचं आणि उद्धव ठाकरे यांचं नातं कसं आहे याचा अभिजीत बिचुकले यांनी खुलासा केला आहे. याचबरोबर त्यांना उद्धव ठाकरे कसे वाटतात हेही सांगितलं.

आणखी वाचा : “किती वाईट दिवस आलेत गुप्तेवर…”, ‘खुपते तिथे गुप्ते’वर प्रेक्षक नाराज, अवधूतला ट्रोल करत म्हणाले…

अभिजीत बिचुकले म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना तर मी उद्धव दादा असंच म्हणतो. त्यांचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे ते राजकीय नेते वाटतच नाहीत. उद्धव दादा सारासार विचार करतात, ते कलाप्रेमी आहेत आणि मला ते भोळे वाटतात.”

हेही वाचा : त्वचा फाटली, ओठांचे तुकडे झाले अन्…; राज ठाकरेंनी सांगितला पत्नी शर्मिला यांच्या बाबतीत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग

दरम्यान, या आगामी भागाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या आगामी भागाच्या प्रोमोंना संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण अभिजीत बिचुकले यांना या मंचावर बोलावल्यामुळे कार्यक्रमाला आणि अवधूत गुप्तेला ट्रोल करत आहेत. तर काहींनी “हा भाग पाहण्यासारखा असेल,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politician abhijeet bichukle revealed about his and uddhav thackeray relation rnv