टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’मध्ये रियाची भूमिका साकाणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जीच्या वडिलांचं निधन झालं असून, तिने वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करत याची माहिती चाहत्यांना दिली आहे. पूजा बॅनर्जीने वडिलांच्या आठवणीत शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पूजा बॅनर्जीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिलं, “बाबा तुमच्या आत्म्याला शांती मिळो. मला माहीत आहे आज तुम्ही जिथे कुठे आहात तिथे चांगल्या ठिकाणी आहात. तुमची नेहमीच आठवण येत राहील. – संदीप, सना, पूजा नील आणि अकाश” पूजाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर तिच्या सहकलाकारांबरोबरच चाहत्यांनीही कमेंट्स करत तिचं सांत्वन केलं आहे.
दरम्यान पूजा बॅनर्जी मागच्या बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पूजा बॅनर्जीने प्रेग्नन्सीमुळे ‘कुमकुम भाग्य’ शोमधून बाहेर पडली होती. काही महिन्यांपूर्वीच तिने मुलीला जन्म दिला असून सध्या ती आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. मुलीसाठी तिने अद्याप कोणत्याही शोमधून पुनरागमन केलेलं नाही. ‘कुमकुम’ भाग्यमध्ये तिने साकारलेली नकारात्मक भूमिका चांगलीच गाजली होती.
पूजा बॅनर्जीच्या कामाबद्दल बोलायचं तर तिने एमटीव्ही ‘रोडीज’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिला ‘एक दसरे से करते हैं प्यार हम’ या मालिकेत लीड रोल म्हणून पहिला ब्रेक मिळाला, जो तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर ती ‘चंद्रकांता’, ‘चंद्र नंदिनी’, ‘दिल ही तो है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये दिसली. तिने ‘कहने को हमसफर हैं’ मधून ओटीटीमध्ये पदार्पण केले.