पूजा सावंत ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजवर तिने ‘क्षणभर विश्रांती’, ‘दगडी चाळ’, ‘चीटर’, ‘भेटली तू पुन्हा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या पूजा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. परंतु, त्याआधी तिने आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे.

पूजा सावंतने यापूर्वी ‘जंगली’ चित्रपटाच्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये काम केलं होतं. यामध्ये तिला अभिनेता विद्युत जामवालबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा एकदा ‘क्रॅक’ चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने पूजा बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. ‘रॉम रॉम’ असं या गाण्याचं नाव असून नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

हेही वाचा : “कर्करोग म्हणजे विनोद नाही”, पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटमुळे अभिज्ञा भावे संतापली; म्हणाली, “अशा लोकांना…”

‘क्रॅक’मधील या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना ‘जंगली’नंतर पुन्हा एकदा पूजा व विद्यूतची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. तिने या गाण्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून नेटकरी यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : ‘झिम्मा’ फेम दिग्दर्शकाने शेअर केला अमोल कोल्हेंचा लोकसभेतील व्हिडीओ; म्हणाला, “यालाच लोकशाही…”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत आजारपणानंतर पूर्णा आजीची पुन्हा एन्ट्री! लेक तेजस्विनी पंडित आईबद्दल म्हणाली…

दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली आहे. यामध्ये पुष्कर जोग, दिशा परदेशी, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री लवकरच सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.

Story img Loader